ठाणे : आतापर्यंत 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेल्या कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला. मतदानाला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराने शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला. एवढंच नव्हे तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेशही केला. रामचंद्र माने असं या उमेदवाराचं नाव आहे.
प्रभाग क्रमांक 30 ड मधून ठाकरे गटाचे उमेदवार रामचंद्र माने आणि शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन पाटील यांच्यामध्ये लढत होती. मतदानासाठी अवघे काहीच दिवस उरले असताना रामचंद्र माने यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनच्या उमेदवाराला ठाकरेंच्या उमेदवाराने बिनशर्त पाठिंबा दिला. तशा आशयाचे पत्रकही त्यांनी जाहीर केले.
Kalyan-Dombivli Election : आणखी एक उमेदवार बिनविरोध
प्रभाग 30 मधून या आधीच डॉ. मनोज बामा पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या अर्जुन पाटील यांना पाठिंबा दिला होता. आता ठाकरेंच्या रामचंद्र माने यांनीही त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिंदे गटाच्या अर्जुन पाटील यांच्या समोर आता एकही उमेदवार निवडणूक लढण्यासाठी शिल्लक नाही.
अर्जुन पाटील यांच्या रुपाने आता कल्याण डोंबिवलीमध्ये 21 वा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामध्ये भाजपचे 14 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
Kalyan-Dombivli Mahanagarpalika Election 2026: भाजपचे बिनविरोध विजयी उमेदवार (एकूण – 14)
1. आसावरी नवरे – प्रभाग क्रमांक 26 (क)
2. रंजना पेणकर – प्रभाग क्रमांक 26 (ब)
3. रेखा चौधरी – प्रभाग क्रमांक 18 (अ)
4. मंदा पाटील – प्रभाग क्रमांक 27 (अ)
5. विशु पेडणेकर – प्रभाग क्रमांक 26 (अ)
6. साई शेलार – प्रभाग क्रमांक 19 (क)
7. महेश पाटील – प्रभाग क्रमांक 27 (ड)
8. दीपेश म्हात्रे – प्रभाग क्रमांक 23 (अ)
9. हर्षदा भोईर – प्रभाग क्रमांक 23 (क)
10. जयेश म्हात्रे – प्रभाग क्रमांक 23 (ड)
11. डॉ. सुनिता पाटील – प्रभाग क्रमांक 19 (ब)
12. पूजा म्हात्रे – प्रभाग क्रमांक 19 (अ)
13. रविना माळी – प्रभाग क्रमांक 30 (अ)
14. ज्योती पाटील – प्रभाग क्रमांक 24 (ब)
KDMC Shivsena Elected Candidates List : शिवसेनेचे बिनविरोध विजयी उमेदवार (एकूण – 7)
डोंबिवली पश्चिम
1 विश्वनाथ राणे – पॅनल क्रमांक 24
2 रमेश सुकऱ्या म्हात्रे – पॅनल क्रमांक 24
3 वृषाली जोशी – पॅनल क्रमांक 24
डोंबिवली पूर्व
4 हर्षल मोरे – पॅनल क्रमांक 28 (अ)
कल्याण पूर्व
5 रेश्मा किरण निचळ – पॅनल क्रमांक 11 (अ)
डोंबिवली
6 ज्योती राजन मराठे – प्रभाग क्रमांक 28 (ब)
7. अर्जुन पाटील - प्रभाग क्रमांक 30