Kandivli East Vidhan Sabha Constituency: कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यामान आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून कालू बढेलिया (Kalu Budhelia) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अतुल भातखळकरांना भाजपकडून तिसऱ्यांदा तिकीट देण्यात आले आहे. याआधी 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत अतुल भातखळकरांनी बाजी मारली होती. त्यामुळे यंदा अतुल भातखळकर विजयाची हॅट्रीक करणार की कालू बढेलिया बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत काय घडलं?
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे अतुल भातखळकर यांनी विजय मिळवला होता. अतुल भातखळकराना 85152 मते मिळाली होती. तर काँग्रेसकडून अजंता यादव यांना 32798 मते मिळाली होती. तर 2014 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अतुल भातखळकर यांनी विजय मिळवला होता.