पुणे: पुण्यातील गुंड गजानन मारणेला (Gajanan Marne) महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ आणि १६ जानेवारीला पुण्यात येण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. गजानन मारणेची पत्नी जयश्री मारणे (Gajanan Marne) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून कोथरूड भागातून निवडणूक लढवत आहे. मात्र विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने गजानन मारणेला पोलीसांनी पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात गजानन मारणेने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ती मान्य करताना उच्च न्यायालयाने गजानन मारणेला १५ आणि १६ जानेवारीला पुण्यात येण्यासाठी परवानगी दिली आहे. दोन दिवसांसाठी जिल्हा बंदी उठवण्यात असल्याने गजानन मारणे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहे.(Gajanan Marne)

Gajanan Marne Pune Election 2026: पुणे शहरात प्रवेश करण्यास केलेला मज्जाव 

मोक्का गुन्ह्यात जामीन देताना पुणे शहरात येण्यास बंदी घालण्यात आलेला गँगस्टर गजा मारणे (Gajanan Marne Pune Election 2026) याला आता महानगरपालिका निवडणुकीसाठी येता येणार आहे, गजा मारणे यांची पत्नी महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. गजा मारणे सध्या त्याच्या मुळशीतील घरामध्ये वास्तव्यास आहे. तर मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय संगणक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणात गजा मारणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणात गजा मारणे याला महापालिका निवडणुकीपूर्वी जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यात याला पुणे शहरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. (Gajanan Marne Pune Election 2026)

पत्नी जयश्री मारणे ही निवडणुकीला उभी आहे. तिला प्रचारात मदत करण्यासाठी पुणे शहरात येऊ द्यावे अशी मागणी करणारा अर्ज गजा मारणे याच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. त्याला पोलिसांनी विरोध केला होता. गजा मारणे याला शहरात प्रवेश दिला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे पोलिसांनी सांगितले त्यानंतर न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावताना त्याला मतदानासाठी त्या दिवशी व न्यायालयातील तारखांना हजर राहण्यासाठी पुणे शहरात येण्यास सवलत दिली आहे. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे अ‍ॅड़ विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले होते. त्यानुसार आता गुंड गजानन मारणेला महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ आणि १६ जानेवारीला पुण्यात येण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.