jayant patil shekap : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी सध्या मतमोजणी सुरु आहे. पहिल्याच टप्प्यात भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके आणि योगेश टिळेकरांचा विजय निश्चित झालाय. पण मतमोजणीमध्ये पहिल्यापासून शेकपाचे जयंत पाटील पिछाडीवर होते. तीन फेऱ्यानंतरही जयंत पाटलांनी दुहेरी संख्याही गाठता आली नाही. पहिल्या पसंतीमध्ये शेकपच्या जयंत पाटील यांना फक्त सहा मतं मिळाली होती. विजयासाठी 23 आकडा गाठावा लागणार आहे. शेकपच्या जयंत पाटलांना हा टप्पा पार पडेल का? असा सवाल उपस्तित होतोय. पिछेहाट दिसत असल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्र सोडले आहे. 


राष्ट्रवादीने शरद पवार गटाने पाठिंबा दिलेले जयंत पाटील यांना कमी मते पडल्याने मतदान केंद्रातून निघून गेले. दुसरीकडे महायुतीमधील भाजपच्या चार उमेदवारांचा विजय झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे दोन उमेदवार विजयाच्या समीप आहेत. तर शिंदेंचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे महायुतीच्या आमदारांनी जल्लोष केलाय. जयंत पाटील, सदाभाऊ खोत आणि मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत निकाल अद्याप समोर आलेला नाही. यामधील एका उमेदवाराचा पराभव निश्चित मानला जातोय. 



सध्याच्या स्थितीला कुणाला किती मतं मिळाली?


उमेदवार - मते


परिणय फुके -  २६


मिलिंद नार्वेकर - २२


कृपाल तुमाने - २४


जयंत पाटील - १२


शिवाजीराव गर्जे - २४


सदाभाऊ खोत - १४


राजेश विटेकर - २३


प्रज्ञा सातव - २५


योगेश टिळेकर २६


अमित गोरखे - २६


पंकजा मुंडे - २६


राजेश विटेकर २१


भावना गवळी २४


शिवाजी गर्जे २०