Madha Loksabha Election News : सध्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर देशातील वातावरण चांगलच गरम झालं आहे. महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आलाय. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केलीय. अशातच सध्या माढा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरुय. माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Loksabha Election) रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, जर मोहिते पाटलांनी निवडणूक लढवली नाहीतर या मतदारसंघातून कोण लढणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र, यावर शेकाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. 


माढ्यावर पहिला क्लेम धैर्यशील मोहिते पाटलांचा, दुसरा अनिकेत देशमुखांचा


माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली नाहीतर  कै. गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) निवडणूक लढवणार आहेत. याबाबतची माहिती खुद्द शेकापचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात पहिला क्लेम हा धैर्यशील मोहिते पाटील यांचा आहे. तर दुसरा क्लेम हा अनिकेत देशमुख यांचा आहे. त्यामुळं मोहीते पाटील लढले नाहीत तर अनिकेत देशमुख माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 


माढा मतदारसंघातील शेतकरी भाजपच्या विरोधात 


जयंत पाटील यांनी मुंबईत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना माढा लोकसभा मतदारसंघाबाबत विचारण्यात आले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की,  माढ्यामध्ये इंडिया आघाडी एकतर्फी निवडणूक लढेल. माढा मतदारसंघातील शेतकरी भाजपच्या विरोधात आहेत. त्यामुळं माढ्यात इंडिया आघाडीचाच उमेदवार विजयी होईल असे जयंत पाटील म्हणाले.  


रायगडमध्ये सुनिल तटकरे यांच्या विरोधात प्रचंड नाराजी


दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघातही चुरशीची लढत होणार आहे. याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनिल तटकरे यांच्यात लढत होणार आहे. या निवडणुकीत भाजप सुनिल तटकरे   यांच्यासोबत राहील की नाही माहिती नाही, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.  मागील निवडणुकीत तटकरे यांना अलिबाग आणि श्रीवर्धनमध्ये जास्त मते मिळाली होती. आता हे चित्रं दिसणार नाही, त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितलं. शरद पवार रायगड लोकसभा मतदारसंघात 3 सभा घेणार आहेत. यावेळी केंद्रीय पातळीवरील नेते देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का, मोहिते पाटील हाती घेणार तुतारी, लवकरच होणार पक्षप्रवेश