Gold Silver Price : सोन्याच्या किंमतीत (Gold Price सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला चांगलीत कात्री लागत आहे. आज पुन्हा सोन्या चांदीच्या दरानं उसळी घेतलीय. किंचीत दराच्या घसरणीनंतर आज पुन्हा सोन्या चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार MCX वर सोन्याचा दर हा 66500 रुपयांवर गेला आहे. 


देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर हे 66475 रुपये प्रति 10 ग्रॅम 


देशांतर्गत बाजारातही सोन्या चांदीच्या दरात चांगली वाढ होताना दिसतेय. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात 108 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर हे 66475 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही चांगलीच वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात 150 रुपयांची वाढ झाली असून प्रतिकिलो चांदीचा दर हा 74 हजार 800 रुपयांवर गेला आहे. दरम्यान, विदेशी बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळात आहे. विदेशी बाजारात सोन्याचा दर हा 2,212 डॉलर प्रति ऑन्सवर पोहोचला आहे. तर चांदी 24.80  डॉलर प्रति ऑन्सवर गेली आहे. सातत्यानं सोन्या चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


सोनं खरेदी करावं की नको! सुवर्ण नगरीत सोन्याला विक्रमी झळाळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री