जनता एक टर्म गुलाबराव पाटील यांना तर एक टर्म गुलाबराव देवकरांना निवडून देत आहे. या मतदारसंघात जळगाव तालुक्यातील काही गावे आणि धरणगाव तालुका येतो. येथे दोन्ही गुलाबरावांपैकी एकाला जनता निवडून देत असल्याने यंदा विद्यमान असलेले आमदार गुलाबराव पाटील पुन्हा निवडून येतील की गुलाबराव देवकरांना जनता संधी देते हे चित्र याठिकाणी पहायला मिळणार आहे.
या मतदारसंघात खडसे समर्थक भाजपकडून पी.सी. आबा पाटील यांनी मागील 2014 सालच्या निवडणुकीत दोन्ही गुलाबरावांना चांगली झुंज दिली होती. यावेळी भाजपा सेना युती होईल की नाही हा अद्याप अनुत्तरीत भाग असला तरीही युती जर झाली तर गुलाबराव पाटील यांच्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना काम करावे लागेल आणि नाही झाली तर पुन्हा पी.सी.पाटील हे दावेदारी सांगू शकतात. धरणगाव तालुका हा आरएसएसचा बालेकिल्ला असल्याने भाजपसाठी एक वोटबँक आज तरी असल्याचे दिसते. त्याचा फायदा भाजपचा उमेदवार उभा राहिल्यास त्याला होवू शकतो.
हे ही वाचा - धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसपुढे बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं आव्हान
एकनाथराव खडसे यांनी एकेकाळी गुलाबराव पाटील यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र बदलत्या राजकीय समीकरणात खडसे आणि गुलाबराव पाटील यांनी आपसात जुळवून घेण्याचे प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर यांना लोकसभेचे तिकीट मिळाले होते. त्यात त्यांचा दारूण पराभव झाला होता. असे असले तरीही ते विधानसभा निवडणुकीत ग्रामीण मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मजबूत दावेदार आहेत. त्यानाही पक्षांतर्गत विरोधक असून मागील महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांच्या उमेदवारीला विरोध झालेला होता. या कारणाने त्यांना ही निवडणूक जड जाईल असेही चित्र आहे. त्यांना ज्ञानेश्वर महाजन, संजय पवार यांचेसह 7 ते 8 जणांनी विरोध केला होता. जळगाव नगरपालिकेच्या तत्कालीन घरकुल घोटाळ्यातही देवकर यांचे नाव असून घरकुल प्रकरणात त्यांना शिक्षा होईल की निर्दोषत्व प्राप्त होईल यावरही त्यांची राजकीय कारकीर्द अवलंबून आहे. त्यामुळे घरकुल घोटाळ्याच्या निकालावर देवकर यांचेसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
हे ही वाचा -जळगाव शहर मतदारसंघ | युतीचं वाढतं वर्चस्व, तर सुरेश जैन यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई
गुलाबराव देवकर यांनी आता ‘मेगा भरती’ फेम गिरीश महाजन यांची दोनवेळा भेट घेतल्याने ते भाजपवासी होणार का अशा चर्चा सुरु आहेत. मेगा भरतीवेळी गुलाबराव देवकर यांचा भाजपात पक्ष प्रवेश होणार अशा चर्चा होत्या. मात्र येथे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील असल्याने ही जागा भाजपसाठी अजून पेच बनली आहे. त्यामुळे देवकरांचा प्रवेश लांबल्याचे देवकर समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. गुलाबराव पाटील हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांना युतीधर्मानुसार दोन्ही गुलाबरावांपैकी कोणाची उमेदवारीसाठी निवड करायची हा प्रश्न राहणार आहे. मात्र युती न झाल्यास ना. महाजन हे उमेदवारीसाठी गुलाबराव देवकरांच्या नावासाठी आग्रह धरू शकतात असे चित्र दिसत आहे. या मतदार संघात गिरीश महाजन यांची भूमिका निर्णायक राहणार असल्याचे मानले जात आहे. असे राहिले तर शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचे काय होणार याकडेही विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.
यानिमिताने दोन्ही गुलाबरावांमध्ये काट्याची टक्कर होणार असे चिन्ह आहेत.
2014 निकाल
गुलाबराव पाटील, शिवसेना - 84,000
गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस - 54,000
30 हजार मताधिक्याने गुलाबराव पाटील विजयी झाले होते.
- जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
- मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
- साक्री विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार?
- बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण
- जालना विधानसभा मतदारसंघ | जालन्यात वंचितची काँग्रेसला धास्ती
- परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
- येवला-लासलगाव मतदारसंघ | छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार?
- अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
- परभणी विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या खेळीने शिवसेना अडचणीत
- मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान