Manipur Election : मणिपूर विधानसभेसाठी काल दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. काल विधानसभेच्या 22 जागांवर मतदान पार पडले. या 22 जागांसाठी 76.62 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी आणि नंतरही काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करत 1 हजार 247 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. या टप्प्यात एकूण 8.38 लाख मतदार होते.
दरम्यान, याबाबत मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, मणिपूर विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पाही बहुतांश भागात शांततेत पार पडला. सायंकाळी एकूण 76.62 टक्के मतदान झाले आहे. यादरम्यान करोंग विधानसभा मतदारसंघात मतदानादरम्यान हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. या हिंसाचारात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लामफेल भागात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) निलंबित नेते सी बिजॉय यांच्या घरावर देशी बनावटीचा बॉम्ब फेकला आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, मणिपूरमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज 10 जिल्ह्यांतील 22 जागांवर मतदान झाले. या मतदानात 92 उमेदवारांचे भविष्य नमतपेटीत बंद झाले आहे. राज्याच्या बाह्य सर्किटमधील जिल्हे हे नागा पीपल्स फ्रंट (NPF) आणि काँग्रेसचे बालेकिल्ले राहिले आहेत. त्यामुळेच यावेळी हे पक्ष सत्ताधारी भाजपला येथून आवाहन देऊ शकणार का? हे पाहावं लागेल. या 22 जागांमध्ये यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 12, काँग्रेसचे 18, नॅशनल पीपल्स पार्टीचे 11, जनता दल युनायटेड आणि नागा पीपल्स फ्रंटच्या प्रत्येकी दहा उमेदवारांचा समावेश आहे.
दरम्यान, पच राज्याच्य विधानसभा निवडणकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आहे. कारण फक्त उत्तर प्रदेशमधील मतदनाचा एक टप्पा राहिला आहे. बाकी सर्व ठिकाणची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. गोवा, पंजाब, उत्तराकंड आणि मणिपूर या ठिकाणी सर्व जागंवरचे मतदान झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील मतदानाचे सहा टप्पे पार पडले आहेत. केवळ एका टप्प्यातील मतदान बाकी आहे. या सर्व जागांचा निकाल येत्या 10 मार्चला जाहीर होणार आहे.