मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी तिकीट वाटपावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तिकीट वाटपात आपल्या समर्थकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संजय निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. निरुपम यांनी एक ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.


काँग्रेसमधील खदखद निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा बाहेर आली आहे. पक्षाला आता माझी गरज वाटत नाहीये, असं ट्विट करत संजय निरुपम यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी सुचवलेल्या नावांकडेही पक्षश्रेष्ठींनी नजरअंदाज केलं, त्यामुळे आता कोणत्याही प्रचारात सहभागी न होण्याचा पवित्रा निरुपमांनी घेतलाय. ज्याप्रमाणे पक्षश्रेष्ठी माझ्याशी वागत आहेत, ते पाहता पक्ष सोडण्याची वेळ फार दूर आहे, असं वाटत नाही, असं सूचक विधानही निरुपम यांनी केलं आहे. याआधीही निरुपमांनी अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं हे ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

Sanjay Nirupam on Congress | पक्ष सोडण्याची वेळ दूर नाही : संजय निरुपम | ABP Majha



दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने  आत्तापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत त्यातील पहिल्या यादीत 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसऱ्या यादीत 52 उमेदवारांचा समावेश आहे.

कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी



    1. अॅड. के. सी पाडवी - अक्कलकुवा

    2. पद्माकर वळवी - शहादा

    3. शिरीष नाईक - नवापूर

    4. शिरीष चौधरी- रावेर

    5. हर्षवर्धन सपकाळ - बुलढाणा

    6. अनंत वानखेडे - मेहकर

    7. अमित झनक - रिसोड

    8. वीरेंद्र जगताप - धामणगाव रेल्वे

    9. यशोमती ठाकूर - तिवसा

    10. अमर काळे - आर्वी

    11. रणजित कांबळे - देवळी

    12. सुनील केदार - सावनेर

    13. नितीन राऊत - नागपूर उत्तर

    14. विजय वडेट्टीवार - ब्रह्मपुरी

    15. सतीश वर्जूरकर - चिमूर

    16. प्रतिभा धानोरकर - वरोरा

    17. बाळासाहेब मंगळूरकर - यवतमाळ

    18. अशोक चव्हाण- भोकर

    19. डी पी सावंत - नांदेड उत्तर

    20. वसंतराव चव्हाण - नायगाव

    21. रावसाहेब अनंतपूरकर - देगलूर

    22. संतोष टारफे - कळमनुरी

    23. सुरेश वर्पूरडकर - पाथरी

    24. कल्याण काळे - फुलंब्री

    25. शेष आसिफ शेख रशीद - मालेगाव मध्य

    26. रोहित साळवे - अंबरनाथ

    27. सय्यद हुसेन - मीरा भायंदर

    28. सुरेश कोपरकर - भांडुप पश्चिम

    29. अशोक जाधव - अंधेरी वेस्ट

    30. नसीम खान - चांदीवली

    31. चंद्रकांत हंडोरे - चेंबूर

    32. झिशान सिद्दीकी - वांद्रे पश्चिम

    33. वर्षा गायकवाड - धारावी

    34. गणेश कुमार यादव - सायन कोळीवाडा

    35. अमीन पटेल - मुंबादेवी

    36. अशोक जगताप - कुलाबा

    37. माणिक जगताप - महाड

    38. संजय जगताप - पुरंदर

    39. संग्राम थोपटे - भोर

    40. रमेश बागवे - पुणे कॅंटोन्मेंट

    41. बाळासाहेब थोरात - संगमनेर

    42. अमित देशमुख - लातूर शहर

    43. अशोक पाटील निलंगेकर - निलंगा

    44. बसवराज पाटील - औसा

    45. मधुकरराव चव्हाण - तुळजापूर

    46. प्रणिती शिंदे- सोलापूर मध्य

    47. मौलाली सय्यद - सोलापूर दक्षिण

    48. ऋतुराज पाटील - कोल्हापूर दक्षिण

    49. पी एन पाटील साडोलीकर - करवीर

    50. डॉ. विश्वजीत कदम - पलूस कडेगाव

    51. विक्रम सावंत - जत




कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार

  1. कुणाल पाटील – धुळे ग्रामीण

  2. राजेश एकाडे – मलकापूर

  3. राहुल बोंद्रे – चिखली

  4. स्वाती वाकेकर – जळगाव (जामोड)

  5. संजय  बोडके – अकोट

  6. विवेक पारस्कर – अकोला पूर्व

  7. रजनी राठोड – वाशिम

  8. अनिरुद्ध  देशमुख – अचलपूर

  9. शेखर शेंडे – वर्धा

  10. राजू परवे – उमरेड

  11. गिरिश पांडव – नागपूर (दक्षिण)

  12. विकास ठाकरे – नागपूर (पश्चिम)

  13. सहसराम कारोटे – आमगाव

  14. आनंदराव गेडाम – आरमुरी

  15. डॉ. चंदा कोडावते – गडचिरोली

  16. सुभाष धोटे – राजुरा

  17. विश्वास झाडे – बल्लारपूर

  18. वामनराव कासावार – वणी

  19. वसंत पुर्के – राळेगाव

  20. शिवाजीराव मोघे – आर्णी

  21. विजय खडसे – उंबरखेड

  22. भाऊराव पाटील – हिंगोली

  23. सुरेशकुमार जेठालिया – परतूर

  24. किसनराव गोरंटियाल – जालना

  25. डॉ. तुषार शेवाळे – मालेगाव (बाह्य)

  26. शिरिषकुमार कोतवाल – चांदवड

  27. हिरामण खोसकर – इगतपुरी

  28. शोएब अश्फाख उर्फ गुड्डू – भिवंडी (पश्चिम)

  29. कांचन कुलकर्णी – कल्याण (पश्चिम)

  30. राधिका गुप्ते – डोंबिवली

  31. कुमार खिलारे – बोरिवली

  32. अरविंद सावंत – दहिसर

  33. गोविंद सिंग – मुलुंड

  34. सुनिल कुमरे – जोगेश्वरी (पूर्व)

  35. अजंता यादव – कांदिवली (पूर्व)

  36. कालू करमनभाई बुधेलिया – चारकोप

  37. युवराज मोहिते – गोरेगाव

  38. जगदीश आमीन – अंधेरी (पूर्व)

  39. जयंती सिरोया – विलेपार्ले

  40. प्रविण नाईक – माहिम

  41. उदय फणसेकर – शिवडी

  42. हिरा देवासी – मलबारहिल

  43. डॉ. मनिष पाटील – उरण

  44. नंदा म्हात्रे – पेण

  45. दत्तात्रय बहिरत – शिवाजीनगर

  46. अरविंद शिंदे – कसबा पेठ

  47. धीरज देशमुख – लातूर ग्रामीण

  48. दिलीप भालेराव – उमरगाव

  49. पृथ्वीराज चव्हाण – कराड (दक्षिण)

  50. अविनाश लाड – राजापूर

  51. राहुल खंजिरे – इचलकरंजी

  52. पृथ्वीराज पाटील – सांगली