पुणे : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरु केला होता. आता खुद्द अध्यक्ष शरद पवारांनीच त्यांचं नाव जाहीर केल्यानंतर पार्थ पवारांच्या प्रचाराला आणखीच जोर चढला आहे. मात्र प्रचारादरम्यान पार्थ पवार माध्यमांधी बोलणं टाळत आहेत. "तुम्ही मला काय विचारणार आहात हे माहित आहे," असं सांगत ते टाळाटाळ करत आहेत.

VIDEO | तुम्ही मला काय विचारणार हे माहित आहे? : पार्थ पवार | पुणे | एबीपी माझा



पार्थ पवार यांनी आज सकाळी एकवीरा देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शरद पवार यांनी बुथप्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत असताना पार्थ यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर पार्थ पवार महड इथे गणपतीच्या दर्शनाला गेले. खोपोली आणि कर्जतमध्येही पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मात्र यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारण्याआधीच तुम्ही मला काय विचारणार आहात हे माहित आहे, असं म्हणत ते माध्यमांना आपल्यापासून दूर ठेवलं.

शरद पवारांनी पार्थ यांच्यासाठी माढ्यातून उमेदवारी मागे घेतली. यानंतर पार्थ यांचे चुलत बंधू रोहित पवारांनी, शरद पवारांना निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीत राजकीय स्पर्धा सुरु झाल्याचं बोललं जात आहे. रोहित पवारांनी या चर्चेचा इन्कार केला. मात्र उमेदवारी आणि गृहकलहावर प्रश्न विचारले जाती, म्हणूनच पार्थ पवार माध्यमांसमोर बोलणं टाळत आहेत.

VIDEO | सुजय विखे 'मातोश्री'वर | मुंबई | एबीपी माझा