मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या एका ट्वीटनंतर तो लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधान आलं. परंतु शेवटी अक्षय कुमारलाच समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं. अक्षय कुमारने पुन्हा ट्वीट करुन या चर्चांना पूर्णविराम दिला. "माझ्या मागच्या ट्वीटमधलं तुम्हा सगळ्यांची उत्सुकता पाहून चांगलं वाटलं, पण मला इथे स्पष्ट करायचं आहे की, मी निवडणूक लढवत नाहीय," असं ट्वीट अक्षयने केलं.


अक्षय कुमारने याआधी ट्वीट करुन म्हटलं होतं की, "आज मी असं काही करणार आहे जे मी यापूर्वी कधीही केलेली नाही. मी याबाबत अतिशय उत्साही आणि अधीर आहे. पुढची माहिती लवकरच..." या ट्वीटनंतरच अक्षय कुमार भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.


चाहत्यांची प्रतिक्रिया
अक्षय कुमारच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. काहींनी अक्षयच्या ट्वीटवर कमेंट करुन तो लवकरच वेब सीरिज घेऊन येणार असल्याचं म्हटलं. तर आगामी चित्रपटात तो तृतीयपंथी लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे, असं काहींनी म्हटलं आहे. मात्र अधिकृतरित्या काहीही समोर आलेलं नाही.