Raigad District Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या काय चित्र आहे, महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोणाला संधी देण्यात आली आहे, जाणून घ्या...

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमेदवार महाविकास आघाडी उमेदवार अपक्ष/ इतर विजयी उमेदवार
1 पनवेल विधानसभा प्रशांत ठाकूर (भाजप) बाळाराम पाटील (मविआ,शेकाप)  योगेश चिले (मनसे)  
2 कर्जत विधानसभा महेंद्र थोरवे (शिंदे गट) नितीन सावंत (ठाकरे गट) सुधाकर घारे (अपक्ष)  
3 उरण विधानसभा महेश बालदी (भाजप) मनोहर भोईर (ठाकरे गट)    
4 अलिबाग विधानसभा महेंद्र दळवी (शिंदे गट) चित्रलेखा पाटील (मविआ-शेकाप) दिलीप भोईर (बंडखोरी भाजप)  
5 श्रीवर्धन विधानसभा अदिती तटकरे (अजित पवार गट) अनिल नवगणे (शरद पवार गट)

फैसल पोपेरे (मनसे)

 

 
6 महाड विधानसभा भरत गोगावले (शिंदे गट) स्नेहल जगताप (ठाकरे गट)    
7 पेण विधानसभा रवीशेठ पाटील (भाजप) प्रसाद भोईर (ठाकरे गट) अतुल म्हात्रे (शेकाप)  
 
पनवेल विधानसभा-
 
प्रशांत ठाकूर (भाजप) 
बाळाराम पाटील (मविआ) शेकाप 
योगेश चिले (मनसे)
 
उरण विधानसभा-
 
महेश बालदी (भाजप)
मनोहर भोईर (मविआ) ठाकरे गट 
प्रितम म्हात्रे (शेकाप)
सत्यवान भगत (मनसे)
 
कर्जत विधानसभा-
 
महेंद्र थोरवे (महायुती) शिंदे गट 
नितीन सावंत (मविआ) ठाकरे गट
सुधाकर घारे (अपक्ष) बंडखोरी महायुती 
 
अलिबाग विधानसभा-
 
महेंद्र दळवी (महायुती) शिंदे गट 
चित्रलेखा पाटील (मविआ) शेकाप
दिलीप भोईर (अपक्ष) बंडखोरी भाजप 
 
पेण विधानसभा - 
 
रवींद्र पाटील (महायुती)भाजप
 
प्रसाद भोईर (मविआ) उबाठा 
 
अतुल म्हात्रे (शेकाप)
 
श्रीवर्धन विधानसभा- 
 
आदिती तटकरे -( महायुती) अजित पवार गट 
अनिल नवगणे (मविआ) श. प. तुतारी गट
फैसल पोपेरे (मनसे)
 
महाड विधानसभा-
 
भरत गोगावले (महायुती) शिंदे गट 
स्नेहल जगताप (मविआ) ठाकरे गट

रायगड जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व-

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांचा विजय झाला. तर ठाकरे गटाचे नितीन गिते यांना पराभवाचा सामना करावा लागला. रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 3, भाजप 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि अपक्ष 1 उमेदवार विजयी झाले होते. सध्याचा विचार केल्यास रायगड जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व असल्याचे दिसून येतंय. कारण शिवसेनेचे तीनही आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. तर अदिती तटकरे देखील महायुतीचा भाग असलेल्या अजित पवार गटासोबत आहेत. 

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेची खडाजंगी: श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा वरचष्मा; महाविकास आघाडीकडून कोण भिडणार?