BMC Election 2022 : महाराष्ट्राला आता नगरपालिका निवडणुकींचे वेध लागलं आहे. येत्या काही महिन्यांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणूक पार पडणार आहेत. निवडणुकी आधी तुमच्या नगरसेवकांने (Corporator) किती विकास केला आणि कुठे निधी खर्च केला हे जाणून घ्या. यावरून तुम्ही तुमचं मत कुणाला द्यायचं याचा विचार करु शकता. नागरिकता रिसर्च सेंटरने एक व्हिडीओ तयार केला आहे.
या व्हिडीओमध्ये तुमच्या नगरसेवकाने गेल्या पाच वर्षात तुमच्या विभागात किती विकास केला आणि निधी कुठे खर्च केला ते जाणून घेता येईल. या व्हिडीओच्या आधारे तुम्ही तुमच्या विभागातील नगरसेवकाचे गेल्या पाच वर्षात निधीचा कुठे आणि कसा वापर केला, याचा लेखाजोखा जाणून घेऊ शकता. तुम्ही नगरसेवकाच्या नावाच्या आधारे पाच वर्षातील कामाचं आकलन करु शकता.
मुंबई पालिकेच्या वेबसाईटवर नगरसेवकाची माहिती उपलब्ध
नागरिकता रिसर्च सेंटरचे समन्वयक आनंद भंडारे यांनी सांगितलं की, नगरसेवकांनी पैसे कुठे खर्च केले याची संपूर्ण माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे, त्यामुळे येथील संपूर्ण माहिती पाहून लोक त्यांच्या नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन करू शकतात.
नागरिकता रिसर्च सेंटरकडून 44 नगरसेवकांच्या कामाचा अहवाल जारी
नागरिकता रिसर्च सेंटरकडून काही नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. या रिसर्च सेंटरच्या वेबसाईटवर तुम्हाला नगरसेवकांच्या कामाचा अहवाल मिळेल. गेल्या सहा वर्षांमध्ये 44 नगरसेवकांच्या कामाचा अहवाल जारी करण्यात आला आहे. रिसर्च सेंटरने वेगवेगळे 56 रिपोर्ट वेबसाईटवर प्रदर्शित केले आहेत.
येथे तपासा नगरसेवकांच्या कामाचा अहवाल
नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी नागरिकता रिसर्च सेंटरने एक व्हिडीओ जारी केला आहे, तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून हा व्हिडीओ पाहू शकता. https://youtu.be/XvPhmNjBljw या व्हिडीओमध्या दाखवलेल्या स्टेप पाहून तुम्ही पालिकेच्या वेबसाईटवर नगरसेवकांच्या कामाचं मूल्यमापन करु शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Pune Government Job : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी, 400 हून अधिक पदांसाठी भरती, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
- HAL Recruitment 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षा न देता मिळेल नोकरी, येथे करा अर्ज
- Bhagatsingh Koshyari : महाराष्ट्राचा अपमान करण्याची पुन्हा हिंमत करू नका; किशोरी पेडणेकर यांचा राज्यपालांना इशारा