Hitendra Thakur, Mumbai : बहुजन विकास आघाडीच्या अडचणीत वाढ झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी हे निवडणूक चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाच्या राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी सह इतर नोंदणीकृत राजकीय पक्ष तसेच अपक्षांना शिटी या चिन्हाचा वापर करता येणार नाही. 


हितेंद्र ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया 


हितेंद्र ठाकूर म्हणाले, माझे कार्यकर्ते आणि मिडिया यांच्या माध्यमातून कोणतीही नवीन निशानी एक दिवसात घराघरात पोहचवतील असा  विश्वास व्यक्त केला. ठाकूर यांनी यावेळी  रोष व्यक्त केला. ते म्हणाले, एवढ्या खालच्या दर्जाच राजकारण कुणी करु नये, ज्यांना हरण्याची भिती आहे. तेच लोक असे उपक्रम करतात, चलता है. लोक बोलत नसतात, पण लोक बघतात, लोक सुज्ञ आहेत. 


लोकसभेत आम्हाला शिटी दिली, आता विधानसभेला त्यांना प्रॉब्लम आला आहे


लोकांना माहिती आहे. आमचा पहिला होता चष्मा तो चष्मा त्यांनी पळवला, त्यानंतर शिटी पळवली, मग रिक्षा घेतली, आता परत शिटी पळवली. ज्याचा महाराष्ट्रात एक ही उमेदवार नाही अशा राजकीय पक्षाला शिटी निशाणी दिली.  लोकसभेत आम्हाला शिटी दिली. आता विधानसभेला त्यांना प्रॉब्लम आला आहे. चिन्हा संबंधी जे नियम आहेत त्यात तरतूद आहे. की, आगोदरचा जो उमेदवार ज्या निशाणी वर जिंकला असेल, ती निशाणी घेण्याचा पहिला अधिकार त्या उमेदवाराला मिळतो. सध्या दबावाखाली हा निशाणी दिली जात नाही, असा आरोपही हितेंद्र ठाकूर यांनी केला. 


आठवणी ताज्या होतील आणि कार्यकर्ते जोशाने कामाला लागतील


पुढे बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले, शिटी गोठवली तर नागरीक भडकतील, हे चोरा चोरीचे धंदे, पळवा पळवीचे धंदे लोकांना थोडा फार विसर पडला होता माञ आता परत त्यांच्या आठवणी ताज्या होतील आणि कार्यकर्ते जोशाने कामाला लागतील. बहुजन विकास आघाडी सहा जागा लढवणार आहे. डहाणूचे आमदार विनोद निकोले, आणि विक्रमगडचे आमदार सुनील भुसार हे आलेले, बविआने  उमेदवार मागे घेण्यासाठी मनधरणी करतात. माञ लोकसभेत आम्ही आमच्या हिशोबात लढतो, आता विधानसभेत ही आम्ही आमच्या हिशोबाने लढणार, असंही हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Video : महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावरुन राज ठाकरेंचं टीकास्त्र, आता शरद पवारांनीच चॅलेंज दिलं