Sharad Pawar on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जातीवादाचे आरोप करत आले आहेत. "महाराष्ट्रात जातीचं राजकारण हे शरद पवार यांनीच सुरू केलं. राष्ट्रवादीची स्थापना 1999 साली झाली. तेव्हापासून महाराष्ट्रात जातीचं राजकारण वाढलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली. मात्र, अजित पवारांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही", असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. आता शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत उलट त्यांना चॅलेंज केलं आहे.
शरद पवार काय काय म्हणाले ?
शरद पवार म्हणाले, मी जातीवाद केल्याचं एक उदाहरण तुम्ही महाराष्ट्रात दाखवा. ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलंच नाही. फक्त वक्तव्य केले, टीका टिप्पणी केली. त्यांच्या वक्तव्याबाबत आपण काय भाष्य करायचं. महाराष्ट्रातील जनता शहानी आहे. त्यामुळे त्यांना राज्यात एकच जागा दिली.
शरद पवार आजच्या पत्रकार परिषदेत काय काय म्हणाले?
सिंचन घोटाळ्याची माहिती अजित पवार यांना फडणवीस यांनी दाखवली. त्यात काही चुकीचं नाही असं फडणवीस म्हणतात. पण त्यांनी घेतलेल्या गुप्ततेचा शपथेचा तो भंग आहे. सिंचन घोटाळ्याचा विषय आम्ही काढला नाही. आरआर पाटील यांची प्रतिमा चांगली होती. स्वच्छ होती. त्यांच्याबद्दल असं बोललं गेलं हे योग्य नाही. ते घडलं नसतं चागलं झालं असतं.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आज दिवस आनंदाचा , महत्वाचा दिवस असतो. महाराष्ट्रातील जनतेला चांगले दिवस यावेत, त्यांच्या जीवनात स्थिरता यावी.
महाराष्ट्रातील आजच्या स्थितीची चिंता वाटते. परिस्थिती हाताळण्यास आजच्या सरकारला अपयश आलं आहे. केंद्र सरकारच्या रँकींगमध्ये महाराष्ट्र पहिल्याच पाच राज्यात नाही. उत्पादनात महाराष्ट्र मागे गेला आहे. त्यामुळे इथलं सरकार बदललं पाहिजे. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाने आपण चित्र बदलू शकतो. परिवर्तन घडवू शकतो. राज्यातील जनतेला सुविधा देण्याच्या योजना या सरकारने बंद केल्याचं चित्र आहे. या योजनांचे निधी इतरत्र वळवला जातोय.
महाविकास आघाडीतील बंडखोर, नाराज शांत होतील. हरियाणाच्या निवडणुकीचा महाराष्ट्रातील निवडणुकीत काडीचाही परिणाम होणार नाही. अरविंद सावंत यांचा शायना एन सी यांच्यावर काही व्यक्तीगत हल्ला केला नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे केलं जातंय. त्यांच्याकडे काही मुद्दा नाही. त्यामुळे त्याचं भांडवलं केलं जातंय. पण बोलताना काळजी घेतली पाहिजे. या सरकारचं वैशिष्ट्य आहे. विमानाने एबी फॅार्म पाठवले. पोलीस दलाच्या गाड्यातून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे.
मी ग्रामीण भागात फिरतोय. महिला लाडकी बहीण योजनेमुळं आनंदी नाहीत. एका बाजुने दिलं आणि दुसऱ्या बाजूने काढून घेतलं, अशी महिलांची भावना आहे.
पाडव्याची ही अनेक वर्षांची परंपरा आहे. ही पद्धत जर कायम राहिली असती तर आनंद झाला असता, अजित पवार यांच्या वेगळ्या पाडव्यावर शरद पवारांनी भाष्य केलं.