Haryana Vidhan Sabha 2024 Result Live : मोठी बातमी! हरियाणात काँग्रेस पिछाडीवर, भाजपा 46 जागांवर पिछाडीवर
Haryana Assembly Election Results 2024 : हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. त्याच्या मतमोजणीचे ताजे अपडेट्स यावर पाहता येतील.
हरियाणात काँग्रेस पिछाडीवर
भाजपाची 46 जागांवर आघाडी
काँग्रेस फक्त 38 जागांवर आघाडीवर
हरियाणात काँग्रेसची आघाडी 42 पर्यंत घसरली
हरियाणात भाजपाची मुसंडी
भाजपा 40 जागांवर आघाडीवर
हरियाणात निकालात उलटफेर
काँग्रेसची आघाडी 44 पर्यंत घसरली
भाजपा 33 जागांवर आघाडीवर
काँग्रेसची हरियाणात मुसंडी
एकूण 65 जागांवर काँग्रेसची आघाडी
भाजपा अवघ्या 19 जागांवर पिछाडीवर
काँग्रेसने 60 चा आकडा केला पार
हरियाणात काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर
भाजपा अवघ्या 19 जागांवर आघाडीवर
जुलाना जागेवरून विनेश फोगाट आघाडीवर
काँग्रेसच्या विनेश फोगाट आघाडीवर
जुलाना जागेवरून विनेश फोगाट आघाडीवर
काँग्रेसच्या विनेश फोगाट आघाडीवर
जुलाना जागेवरून विनेश फोगाट आघाडीवर
काँग्रेसच्या विनेश फोगाट आघाडीवर
हरियाणात काँग्रेस 63 जागांवर पुढे
हरियाणात भाजपाची पिछेहाट
भाजपा अवघ्या 17 जागांवर पुढे
हरियाणात काँग्रेसची 60 जागांवर आघाडी
भाजपाची हरियाणात पिछाडीवर
भाजपा अवघ्या 17 जागांवर आघाडीवर
हरियाणात मुख्यमंत्री नायब सिंह सैनी पिछाडीवर
सैनी यांनी लाडवा या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
हरियाणात भाजपाची 20 जागांव आघाडी,
काँग्रेसची 50 जागांवर मुसंडी
हरियाणात काँग्रेस तब्बल 47 जागांवर आघाडीवर
भाजपा अवघ्या 18 जागांवर आघाडीवर
हरियाणात काँग्रेस एकूण 40 जागांवर आघाडीवर
भाजपा 28 जागांवर आघाडीवर
अन्य 3 जागांवर आघाडावर
हरियाणात मतमोजणीला सुरुवात
काँग्रेस आघाडीवर, भाजपा पिछाडीवर
एनडीटीव्हीच्या पोलनुसार हरियाणात काँग्रेसला 55 आणि भाजपला 25 जागा मिळू शकतात. पीपल्स पल्समध्ये काँग्रेसला 49 ते 61 जागांवर तर भाजप 20 ते 32 जागांवर आघाडीवर दाखवला आहे. इंडिया टीव्हीच्या पोलनुसार काँग्रेसला 44 ते 54 जागा आणि भाजपला 19 ते 29 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पीमार्कच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 51 ते 61 जागा आणि भाजपला 27 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हरियाणामध्ये एकूण 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. या राज्यात भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
पार्श्वभूमी
Haryana Vidhan Sabha Results 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काहीच वेळात झाली आहे. एकीकडे भाजपला सत्ता टिकवण्याचा विश्वास असताना दुसरीकडे काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याची आशा बाळगून आहे. हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. हरियाणात बीजेपी, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी मुख्य लढत होत आहे. तसेच नॅशनल लोक दल-बहुजन समाज पार्टी आणि जननायक जनता पार्टी आझाद समाज पार्टी यांच्यात निवडणूक पूर्व आघाडी झालेली आहे. या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आधी पोस्टल बॅलेटची मतमोजणी
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाली, अर्ध्या तासानंतर ईव्हीएममधून मतमोजणी झाली. राज्यातील 22 जिल्ह्यांतील 90 विधानसभा मतदारसंघांसाठी 93 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. बादशापूर, गुरुग्राम आणि पतौडी विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्रे आणि उर्वरित 87 विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक मतमोजणी केंद्र आहे.
सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त तैनात
मतमोजणी प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने 90 मतमोजणी निरीक्षकांचीही नियुक्ती केली होती. केंद्रीय सुरक्षा दलाच्या 30 कंपन्या 93 मतमोजणी केंद्रांवर तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यभरात स्थापन करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रांवर सुमारे 12 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी उभारण्यात आलेल्या 90 स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत, जेणेकरून प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवता येईल.
मतमोजणी केंद्राच्या मुख्य गेटपासून संपूर्ण मतमोजणी केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, मतमोजणीशी संबंधित प्रत्येक कामावर लक्ष ठेवता येईल.मतमोजणीत आधी पोस्टल मतपत्रिका आणि नंतर ईव्हीएमची मतमोजणी होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -