नवी दिल्ली : निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत जम्मू काश्मीर आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक जाहीर केली. जम्मू काश्मीरची निवडणूक तीन टप्प्यात पार पडणार आहे. तर, हरियाणाची निवडणूक एका टप्प्यात पार पडेल. हरियाणात 1 ऑक्टोबरला मतदान होणार असून 4 ऑक्टोबरला दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी होईल. हरियाणाची विधानसभा निवडणूक यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबत झाली होती. यावेळी मात्र जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगानं तारखांची घोषणा करताना दोन्ही राज्यांमधील मतदारांबाबत माहिती दिली. यामध्ये हरियाणामधील एका आकडेवारीमुळं वेगळेपण दिसून येतं.
हरियाणा विधानसभेसाठी एकूण मतदारांची संख्या 2.1 कोटी आहे. हरियाणात 2 लाख 55 हजार मतदार 85 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. तर, 10 हजार 321 शतायुषी मतदार आहेत. तर, राज्यात 1.5 लाख दिव्यांग मतदार आहेत. हरियाणातील शंभरी पार करणाऱ्या मतदारांची संख्या 10 हजार 321 आहे. ही आकडेवारी चर्चेत आहेत.
हरियाणा राज्यातील लोक त्यांच्या ताकदीसाठी आणि मजबुतीसाठी ओळखले जातात. हरियाणातील लोकांच्या आहारात दूध, दही आणि तूप मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं भारताच्या क्रीडा क्षेत्रात आणि ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवून देणाऱ्यांमध्ये देखील हरियाणाचे खेळाडू आघाडीवर असतात. हरियाणाच्या लोकांच्या फिटनेसचा अंदाज तिथल्या शंभरी पार केलेल्या मतदारांच्या आकडेवारीमुळं येतो. हरियाणात शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या 10 हजार 321 इतकी आहे.
दरम्यान, हरियाणा राज्यात विधानसभेच्या 90 जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि जेजेपीची सत्ता आली होती. भाजप सरकारकडे आता 43 आमदारांचं समर्थन आहे तर काँग्रेसकडे 42 आमदार आहेत. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी 20 हजार 629 मतदान केंद्रांवर मतदान होईल. यापैकी 7132 मतदान केंद्र शहरी भागात तर 13497 मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. एका मतदान केंद्रावर 977 मतदार मतदान करतील.
हरियाणामध्ये मतदानाची टक्केवारी चांगली राहावी यासाठी निवडणूक आयोगानं विविध उपाययोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून 85 पेक्षा अधिक वय असणार्या मतदारांना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
संबंधित बातम्या :