Maharashtra Gram Panchayat Elections 2023: राज्यभरातल्या (Maharashtra News) 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat Elections) आज मतदान (Voting) होणार आहे. तर 2 हजार 950 सदस्यपदांच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. तर मतमोजणी उद्या (सोमवारी, 5 नोव्हेंबर 2023) होणार आहे. मात्र गडचिरोली (Gadchiroli) आणि गोंदिया (Gondia) या नक्षलग्रस्त भागांत (Naxal Affected Areas) सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागांत 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल. राज्यात महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे? हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. 


ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणारे जिल्हे 



  • नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक 361 ग्राम पंचायतीसाठी आज मतदान होत आहे. 

  • अमरावती : अमरावती जिल्ह्यात 20 ठिकाणी ग्रामपंचायतीसाठी आज निवडणूक होतेय. यात एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. सोबतच 17 ग्रामपंचायत मध्ये पोट निवडणूक होणार आहे ज्यात एक सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे.

  • वाशिम : वाशीम जिल्ह्यातील 2 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक होत आहे.

  • भंडारा  : भंडारा जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान होत आहे.

  • गोंदिया  : जिल्ह्यातील 4 ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

  • बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात आज 48 ग्राम पंचायतीच्या निवडणुका तर 10 ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. मतदान केंद्रावर हे मतदान होत असून 1000 कर्मचारी या प्रक्रियेसाठी लावलेले आहेत.

  • वर्धा : वर्ध्यात एकूण 63 ग्राम पंचायत मध्ये निवडणूक होत आहे. यात सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीचा समावेश आहे.

  • नाशिक : नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायत पैकी 45 ग्रामपंचायतसाठी आज मतदान होणार आहे.

  • अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात आज 194 ग्रामपंचायतसाठी निवडणूक होणार आहे...त्यापैकी 74 ग्रामपंचायत या दक्षिण नगर जिल्ह्यातील आहेत , पैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. नगरमध्ये राम शिंदे, रोहीत पवार, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, प्राजक्त तानपुरे, शंकरराव गडाख या नेत्यांच्या पॅनल मध्ये लढत आहे. तर ऐतिहासिक शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबा गावात ग्रामपंचायत निवडणूक पार पडणार असून यात आमदार काळे विरुद्ध भाजपचे कोल्हे आणि भाजपचे विखे पाटील यांच्या पॅनल मध्ये तिरंगी लढत दिसणार आहे. 

  • जळगाव : जळगाव जिल्ह्यात 151 ग्रामपंचायतीसाठी आज निवडणूक होत आहे. तर इतर 16 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्यात. 

  • नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून सर्व ग्रामपंचायत शहादा तालुक्यातील आहेत.

  • धुळे : धुळे जिल्ह्यातील आज 26 ग्रामपंचायतसाठी निवडणुका होतस. तर इतर 5 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्यात.

  • लातूर : लातूर जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतीमध्ये  निवडणूक होतायत, त्यापैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. सहा ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक आहे.

  • बीड : बीड जिल्ह्यात आज तब्बल 158 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे, तर इतर 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आणि 18 ग्रामपंचायत मध्ये एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नाही.

  • सोलापूर : जिल्ह्यातील 109 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यातील 9 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित 100 ग्रामपंचायतीसाठी मतदान आज पार पडणार आहे.

  • धाराशिव : धाराशिमध्ये 6 ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूकीसाठी मतदान होईल.

  • हिंगोली : हिंगोलीमध्ये एकूण 32 सदस्य निवडणूक आणि बिनविरोध झालेले सदस्य 23 तर सरपंच पदासाठी एकही नाही.

  • बारामती : बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायत निवडणूक आहेत. भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी लढाई

  • चंद्रपूर : जिल्ह्यात 8 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक आहेत तालुकानिहाय ग्रामपंचायती आणि मागील काळातील सत्तास्थितीची माहिती

  • अमरावती : जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक आहेत. तर एक बिनविरोध अशी आहे.

  • गोंदिया : जिल्ह्यामध्ये 4 ग्रामपंचायतीमधे सार्वत्रिक निवडणूक तर 10 ठिकाणी पोटनिवडणूक पार पडणार आहे. 

  • परभणी : जिल्ह्यात 3 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक तर 7 ठिकाणी पोटनिवडणूक पार पडणार आहे.

  • सिंधुदुर्ग : जिल्ह्यात 24 ग्रामपंचायतींच्या आणि 52 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका पार पडणार आहे.

  • सांगली : जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायत निवडणूक आहेत पैकी 11 ग्रामपंचायती बिनविरोध पार पडणार आहे.

  • पालघर : जिल्ह्यात 51 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असून 49 ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणूक आहेत.

  • अकोला : जिल्ह्यात 5 नोव्हेंबरला 14 ग्रामपंचायतींची 14 सरपंचपदे आणि 111 सदस्यपदांसाठी सार्वत्रिक निवडणूक आहेत.

  • नांदेड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकित आता पर्यंत पोटनिवडणुकीत 40 सदस्य बिनविरोध निवडून आले आहे तर 3 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहे, पोटनिवडणुक आता 25 ग्रामपंचायतमध्ये होणार आहे

  • वर्धा : वर्धामध्ये 63 ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूकीसाठी मतदान होईल.

  • ठाणे : भिवंडी - 14 ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूकीसाठी मतदान होईल. तर मुरबाड  तालुक्यात 29 ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक असून उद्या मतदान होणार आहे. 29 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 19 ग्रामपंचायत साठी मतदान होणार आहे

  • यवतमाळ : जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायतिची  सार्वत्रिक निवडणूका होत आहे. यातील 6 ग्रामपंचायतिच्या निवडणूक बिनविरोध मतदान होईल .

  • रायगड : जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतिची  सार्वत्रिक निवडणूका होत आहे

  • जळगाव : जिल्ह्यात  167 ग्रामपंचायती साठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 16 ग्राम पंचायत या बिन विरोध झाल्याने 151 ग्रामपंचायती आहे.

  • अहमदनगर : जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होणार असून यातील 16 ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध मतदान होईल

  • पुणे : जिल्ह्यात 231 ग्रामपंचायत साठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे त्यापैकी 37 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली.

  • संभाजीनगर : 9 तालुक्यातील 68 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात 16 सार्वत्रिक तर 28 ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे

  • कोल्हापूर : जिल्ह्यात एकूण 86 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होतीय. त्यापैकी 74 सार्वत्रिक आणि 12 पोट निवडणूक पार पडली

  • रत्नागिरी : जिल्हयातील 14 सार्वत्रिक ग्रामपंचायती, 171 रिक्त सदस्य पदासाठी,3 थेट सरपंच रिक्त पदांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे

  • सिंधुदुर्ग : जिल्ह्यात 5 नोव्हेंबरला 24 ग्रामपंचायतींच्या आणि 52 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहेत.

  • जळगाव : जिल्ह्यात 167ग्राम पंचायती साठी निवडणूकीसाठी मतदान होईल


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान; 2369 ग्रामपंचायतीसह, 130 सरपंचांच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान