Gopichand Padalkar, सांगली : "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा आलेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाची चिंता मिटली. आता महाराष्ट्रात विकासाचं राजकारण होऊ शकतं. शरद पवारांना देव केलं होतं, त्यांच्यावर काही बोलायचं नाही. हे कुठले चाणक्य? आज काय परिस्थिती आहे पाहा..टिव्हीवर काय वातावरण होतं. जयंतराव नव्या नवरीगत नटून फिरत होता. इकडं शरदरावांना भेटतोय. हिकडं उद्धव साहेबांना भेटतोय. यांची लायकी काय...मला पाडण्यासाठी प्रयत्न करत होते, हे केवळ 11 हजारांनी निवडून आले आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे", असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर (Jayant Patil) जोरदार हल्लाबोल केलाय. ते सांगलीत बोलत होते.    


थोतांड पुरोगामी लोकांना महाराष्ट्राने त्यांची जागा आणि लायकी दाखवून दिली


लोकांनी विरोधकांचा जातीवादाचा किडा ठेचून काढला. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला मिळालेला हिरा आहे. त्याला तुम्ही जपण्यापेक्षा डॅमेज करण्याचा प्रयत्न करता. याचा मला खूप राग आला. थोतांड पुरोगामी लोकांना महाराष्ट्राने त्यांची जागा आणि लायकी दाखवून दिली. लोकांनी दाखवून दिलं की, आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने ताकदीने उभे राहतो. तुमच्या 51-52 जागा येऊ शकत नाहीत. आज मला याचा आनंद आहे. 


देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींवर जनतेचं प्रेम होतं


गोपीचंद पडळकर म्हणाले, माझ्यावर खालच्या पातळीवर जात टीका करण्यात आली. मी उपरा असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, भारतीय जनता पार्टीवर लोकांचे खूप प्रेम होतं. महायुती, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींवर जनतेचं प्रेम होतं. जत विधानसभा मतदारसंघातील लोकांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास होता. त्यामुळे तेथील जनतेने मला भरभरुन मतदान केलं. जवळपास 38 हजारांपेक्षा जास्त मला मताधिक्य देण्यात आलं होतं. 


पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, आम्ही लोकांमध्ये होतो, लोकांच्यामध्ये जात होतो. लोकांनी आम्हाला उत्सुर्त प्रतिसाद दिला. वाड्या वस्त्यांवर दौरे केले. देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा शुभारंभ जतमधून केला. त्यांनी जतमध्ये एमआयडीसी आणि प्रकल्प देण्याचं मान्य केलं. या काही गोष्टी आमच्यासाठी सकारात्मक होत्या. आम्ही महाराष्ट्रातील मुलांना प्रत्येक बुथची जबाबदारी दिली होती. त्यांनी समन्वय करुन खूप चांगलं काम केलं. 





इतर महत्त्वाच्या बातम्या 


Katol Vidhan Sabha Election 2024 : वडिलांचा गड राखण्यात सलील देशमुख अपयशी, काटोलमध्ये भाजपचे चरणसिंग ठाकूर ठरले 'किंग' 


Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा