मुंबई : प्रचारसभांचा खर्च पक्ष करत असतात. जर राज ठाकरेंची सभा कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारासाठी नसेल तर त्यात निवडणूक आयोग काहीही हस्तक्षेप करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.
ज्या राजकीय धोरणांसाठी सभा घेतली जाईल त्या धोरणांशी संबंधीत इतर पक्ष आपापसात हा खर्च समझौता करुन वाटून देखील घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीत न उतरलेला व्यक्ती, पक्ष स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनं सभा घेऊ शकतात, अशी माहिती नीला सत्यनारायण यांनी दिली.
भाजपकडून मनसेच्या सभेच्या खर्चाची चौकशी करा अशी मागणी येत असेल तरी तक्रार नेमकी कोणत्या मुद्द्यावर करायची हे आधी त्यांना ठरवावं लागेल, असेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा, निवडणूक आयोग संभ्रमात
राज ठाकरे यांच्या सभेमुळे निवडणूक आयोगाची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण, आचारसंहिता काळात सभांचा खर्च हा उमेदवाराच्या नावावर टाकला जातो. मात्र, मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे.
मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यावेळी आपण भाजप-शिवसेना सरकारविरोधात प्रचार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार राज ठाकरेंनी यांच्या विविध सभा राज्यभरात होणार आहेत.
मुंबईतील शिवाजी पार्कवरील विराट सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे नांदेडमध्ये देखील राज ठाकरे विविध मुद्द्यांवर मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता.

UNCUT | नांदेडमध्ये राजगर्जना, राज ठाकरेंचं नांदेडच्या सभेतील संपूर्ण भाषण | एबीपी माझा