औरंगाबाद लोकसभा तिकीट वाटपावरुन नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला रामराम केला होता. सुभाष झांबड यांना काँग्रेसने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचं सांगत त्यांन बंड पुकारलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभं राहणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलं होतं.
VIDEO | अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता | ब्रेकफास्ट न्यूज | औरंगाबाद | एबीपी माझा
मात्र त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी 23 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपमध्ये सुरु असलेल्या इन्कमिंगमध्ये अब्दुल सत्तारांच्या नावाचा समावेश होणार का? याबाबत चर्चांना उधाण आलं होतं.
आता चिकलठाणा विमानतळावर रावसाहेब दानवे आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासोबत अब्दुल सत्तार यांची बैठक झाली. त्यानंतर दानवे आणि सत्तार दोघे एकाच विमानातून मुंबईला आले. त्यामुळे सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
VIDEO | आमदार अब्दुल सत्तार यांचं गाजलेलं भाषण
संबंधित बातम्या
अब्दुल सत्तार यांची बंडखोरी अशोक चव्हाणांच्या गुप्त सूचनेनुसार?
औरंगाबाद काँग्रेसमध्ये खुर्च्यांवरुन राजकारण, राजीनाम्यानंतर अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यालयातील खुर्च्या सोबत नेल्या
औरंगाबाद लोकसभेच्या तिकीटावरुन काँग्रेसमध्ये जुंपली, आमदार अब्दुल सत्तारांनी बंड पुकारलं, अपक्ष लढणार