सावंतवाडी : निवडणूक होऊ दे त्यानंतर मातोश्री समोर येऊन तोंडं कायमची बंद करेन असा इशारा भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राणे गप्प बसतील असे कोणाला वाटत असेल तर तसे होणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यातील तीनही जागा भाजपच्या असतील असा विश्वास व्यक्त केला. सावंतवाडीतल्या प्रचारसभेत राणे बोलत होते.

‘मी’ असा तसा होतो, तर मला मुख्यमंत्री का बनवले? शाखाप्रमुख, बेस्ट चेअरमन, मंत्री, आमदार, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता ही पदे का दिली?, असा सवालही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

Narayan Rane | राणे टीका पचवत नाही, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर नारायण राणेंचा सूचक इशारा | ABP MAJHA



दीपक केसरकर यांना विकासाची दिशा माहिती आहे का? असा सवाल करत नारायण राणे यांनी आपल्या  भाषणाला सुरुवात केली. या जिल्ह्याचा पालकमंत्री मंत्रिमंडळात चेष्टा आणि मस्करीचा विषय बनला आहे. मंत्रिमंडळातील जोकर म्हणजे दीपक केसरकर अशा परखड शब्दात नारायण राणे यांनी केसरकरांवर टीका केली आहे. पर्यटनात गोवा सिंधुदुर्ग पेक्षा जास्त पुढे असल्याने गोव्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करणार आहे. कोकणाच्या विकासासाठी उध्दव ठाकरे यांनी काय केलं? त्यांचं योगदान काय? शिवसेनेच्या नेत्यांनी काय केलं कोकणासाठी? यांसारखे सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केले.

Uddhav Thackeray Slams Rane | मान वाकवणारा स्वाभिमान काय कामाचा, उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर टीका | ABP MAJHA



कणकवलीमधील उद्धव ठाकरे यांच्या सभेत 18 मिनिटांच्या भाषणात नारायण राणेंवर 18 मिनिटे उध्दव ठाकरे बोलले. अन्य ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यावर टीका का केली नाही असा सवालही राणे यांनी उपस्थीत केला. राणे 24 तारीखेपर्यंत बोलणार नाही. निवडणुकीनंतर मातोश्री समोर येऊन 25 तारीखेला बोलेन आणि सेनेचे तोंड बंद करेन. वाघाचं नाव घेणं उद्धवला शोभत नाही. शेळ्या-मेंढ्यांचीच नाव उध्दव ठाकरेंच्या तोंडात शोभतील.

शिवसेनेच्या जन्मापासून वाढताना पाहिलेला नारायण राणे आहे. कोकणाला आत्तापर्यंत सेनेने काही दिल नाही, मीच सरकारशी भांडून योजना आणल्या. सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये, मालवणमध्ये मी आणला. येत्या दोन वर्षात आम्ही सी-वर्ल्ड प्रकल्प करु असं मुख्यमंत्री बोलले आहेत. दीपक केसरकरांनी खोट बोलून मंत्रीपद घेतलं. तसेचं मला न घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना फोन करून छळलं असा आरोपही राणेंनी दीपक केसरकर यांच्यावर केला. जिल्ह्यातील सर्वात मोठी तिलारी नळपाणी योजना जी दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण पर्यंत जाणार होती ती दीपक केसरकर यांनी बंद केली. त्या योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदारकडून पैसे घेऊन अर्ध्ये पैसे मातोश्रीवर पोहोचले असतील. म्हणून प्रकल्प बंद केला असल्यांचही राणे यांनी सांगितले.

EXCLUSIVE | आदित्य ठाकरेंना आधी आमदार तर होऊ द्या, निलेश राणेंची मुलाखत | सिंधुुदुर्ग | ABP Majha