Election Results 2023 : मिनी लोकसभा (Lok Sabha 2024) म्हणून पाहिल्या जात असलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल (Four states results) जाहीर होत आहे. सुरुवातीच्या हाती आलेल्या कलानुसार मध्यप्रदेश (MP Election), राजास्थान (Rajsthan) , छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप (BJP) आघाडीवर आहे. तीन राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजपच्या या दणदणीत विजयाचं सेलिब्रेशन भाजप मुख्यालयात होणार आहे. भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.
मध्यप्रदेशसह तीन राज्यांत विराट विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. यावेळी जनतेते आणि कार्यकर्त्यांचे मोदींनी आभार मानणार आहे. राज्यांत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चार राज्याच्या निवडणुकींचे निकाल समोर आले आहेत. यात भाजपने दणदणीत यश मिळवलं आहे. चार राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजपच्या दणदणीत विजयाचं सेलिब्रेशन राजधानी नवी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मोदींबरोबर, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं
मध्यप्रदेशात (MP Election 2023) विधानसभेच्या 230 जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या कलामध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपने पहिल्या कलात 155 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने अवघ्या 74 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी एका जागेवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने मध्यप्रदेशाच किंगमेकर होण्याचं काँग्रेसचे स्वप्न भंगलं आहे.राज्यात बहुमतासाठी 116 जागा आवश्यक आहे. पहिल्या कलात भाजपने 155 जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. अर्थातच दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर आहे.
राजस्थानमध्ये भाजपचा करिश्मा
राजस्थानमध्ये (Rajasthan Election 2023) भाजपचा करिश्मा पाहायला मिळत आहे. राजस्थानात भाजप 130 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 25 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान करण्यात आले. त्यामुळे आता संपूर्ण जनेतसह राजकारणी देखील अंतिम निक्लाची वाट पाहत आहे. दरम्यान राजस्थानमध्ये काँग्रेस आपली सत्ता टिकवण्यात यशस्वी होणार की भाजप बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या राजस्थानमध्ये भाजप 130 जागांवर तर काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर आहे.