Eknath Shinde on Dilip Sopal, Barshi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ बार्शीत सभा घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "विरोधी उमेदवारने जंग जंग पछाडलं तरी राजेंद्र राऊत निवडून येणार आहेत. ज्यांनी सोलापूर जनता बँक लुटली त्यांना तुम्ही निवडून देणार का? सोपल यांच्यावर विविध संस्था लुटल्या आहेत. 320 कोटींचा घोटाळा केला, त्याला तुम्ही निवडून देणार?" असा सवाल करत एकनाथ शिंदेंनी सोपलांवर टीका केली आहे.
राजेंद्र राऊत यांच्या हातात धनुष्यबाण शोभून दिसतो
एकनाथ शिंदे म्हणाले, मी जनतारुपी भगवंत महाराजांचे दर्शन घ्यायला आलो आहे. राजेंद्र राऊत हा राजा माणूस आहे. राजेंद्र राऊत यांच्या सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय. राजेंद्र राऊत यांच्या हातात धनुष्यबाण शोभून दिसतो. काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला. प्राणपणाने आम्ही जपणार आहोत. काही लोक म्हणतात, आमचा धनुष्यबाण चोराला, धनुष्यबाण चोरायला काय खेळणी आहे का? एकनाथ शिंदेने धनुष्यबाण वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकले. राजाभाऊंनी ठरवलं असतं तर त्यावेळेस ते मंत्री झाले असते. उद्धव ठाकरेंनी 2019 ला भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, विश्वासघात केला. उद्धव ठाकरे सत्तेसाठी दिल्लीच्या दारोदारी फिरत आहेत. तुमच्याच महाविकास आघाडीला तुमचा चेहरा चालत नाही, महाराष्ट्राला तुमचा चेहरा कसा चालेल? अशी टीकाही शिंदेंनी केली.
सोपल सोपल करून चालत नाही मेहनत करावी लागते
आम्ही सांगतिल होतं, लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद करणार नाही. आम्ही देणारे आहोत आणि सांगल तेच करत आहोत. दीड हजारांवरून आम्ही दोन हजार शंभर रुपये करत आहोत. ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. युवकांसाठी 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. लाईट बिलाला 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. सावत्र भावांना तुम्ही या निवडणुकीत धडा शिकवायचा. हे फक्त राजाभाऊ सारखा हाडाच्या शिवसैनिकाला जमू शकतं. सोपल सोपल करून चालत नाही मेहनत करावी लागते. राजेंद्र राऊत यांची तुमच्यावर काय जादू आहे ते कळत नाही त्यांचं नाव घेतलं की करंट येतो. महाविकास आघाडीत बार्शीला भोपळा मिळाला. महायुतीचं सरकार आल्यानंतर बार्शीला चार हजार कोटी दिले. शेतकऱ्यांसाठी हे सरकार हात आकडता घेणार आहे. वैराग तालुका नंबर एकचा असणार आहे, वैराग तालुक्याची घोषणाही एकनाथ शिंदेंनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले