Eknath Shinde On Najib Mulla ठाणे: ठाणे जिल्हा म्हणजे महायुतीचा बालेकिल्ला आहे. आनंद दिघे यांनी कळव्या मुंब्रावर खूप प्रेम केलं. लाडक्या बहिणींनो आपला लाडका भाऊ नजीब मुल्ला (Najeeb Mulla) यांना मतदान करायचं आहे. नजीब मुल्ला हा कोकणी मराठी माणूस आहे. त्यांच्या नावावर जाऊ नका, असं आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळे ते बोलत होते.


ठाणे मनपाकडून साडे तीन हजार कोटींचा निधी दिला, मात्र तरीही कळवा-मुंब्राला निधी देत नाही, अशी ओरड येथील आमदार सतत करत राहिले. पहिल्यांदा नजीबनेच या मतदारसंघातील घराघरात जाऊन त्यांचा प्रचार केला. आज नजीब मुल्ला यांना त्याचा पश्चाताप होतो आहे. त्यामुळे कळवा मुंब्रा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा तर बंटीची घंटी वाजवून नजीब मुल्ला यांना मतदान करा, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. 


नजीब आपला पोरगा आहे-  एकनाथ शिंदे


नजीबचे घड्याळ आहे, आपला आहे तो, नजीब आपला पोरगा आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस , अजित पवार हे नजीबसोबत आहे, मग आणखी काय हवंय?एवढे वर्ष सहन केलं आता करायचं नाही. नजीब कळवा मुंब्राचा विकास करेल ही जबाबदारी मी घेतो.  नजीब तू  निवडून आल्यावर, सगळ्यांना मदत करायची, मदतीला धावून जायचं, असं एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत सांगितलं. कळवा मुंब्रामध्ये युतीचे मतदार राहतात. नजीब मुल्लाने महापालिका सभा गाजवली. त्यामुळे आता विधासभा गाजवायची आहे, त्यासाठी त्याला विधानसभेत पाठवा. कळवा मुंब्रा मतदारसंघात 3 वेळा एक ढोंग जिंकला, अशी टीका एकनाथ शिंदेंनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. 


विजेच्या बिलात 30% टक्के सवलत देण्याचा निर्णय घेणार- एकनाथ शिंदे


तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात 25 हजार बहिणींची भरती करणार आहे. वाकड्या नजरेने बघणाऱ्याला फाशी दिल्याशिवाय राहणार नाही. तसेच 25 लाख रोजगार निर्माण करणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. महायुतीचं सरकार आल्यास विजेच्या बिलात 30% टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. नजीबला निधी किती मिळाला?, 3 महिन्यात 200 कोटी...मग 5 वर्षात किती मिळेल? आमदारांना निधी मिळत नव्हतं, म्हणून आम्ही सरकार बनवलं. आमच्या प्रत्येक आमदाराला 2 ते 3 हजार कोटी विकास करण्यासाठी फंड दिला, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. 


नजीब मुल्ला हा कोकणी मराठी माणूस- एकनाथ शिंदे