मंत्रीपद, उमेदवारी कोणाला द्यायची? युतीनंतर तिकीट वाटपावरुन 'मातोश्री'वर धुमश्चक्री
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2019 01:21 PM (IST)
युती झाली तर लोकसभेचं तिकीट कोणाला द्यायचं असा प्रश्न सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पडला आहे. कारण कार्यकर्ते आणि नेते सध्या उद्धव ठाकरेंच्या डोक्याला तापदायक ठरत आहे.
मुंबई : युती होण्याआधी निवडणुका जिंकायच्या कशा? असा प्रश्न मातोश्रीला पडला होता. आता युती झाली तर लोकसभेचं तिकीट कोणाला द्यायचं असा प्रश्न सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पडला आहे. कारण कार्यकर्ते आणि नेते सध्या उद्धव ठाकरेंच्या डोक्याला तापदायक ठरत आहे. कोणाला खासदारकी लढवायची आहे तर कोणाला कॅबिनेट मंत्री व्हायचं तर काही कार्यकर्ते म्हणतात या विद्यमान खासदारांना परत निवडून आणायचं कसं? आता मातोश्रीमध्ये नेमकी काय धुमश्चक्री सुरु आहे पाहूया कॅबिनेट मंत्रीपदासाठी मातोश्रीवर दबाव? 1) अर्जुन खोतकर, जालना आमदार 2) बाळू धानोरकर, चंद्रपूर, वरोरा 3) राहुल पाटील, परभणी लोकसभेच्या तिकीटावरुन धुमश्चक्री नाशिक - हेमंत गोडसे, खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट देऊ नका, यासाठी नाशिकचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी मातोश्रीवर आवाज वाढवत जोरदार राडा घातला होता. हेमंत गोडसेंपेक्षा माझ्याकडे जास्त पैसै आहेत मला निवडणुकीचं तिकीट हवंय, अशी मागणी त्यांनी केली होती. औरंगाबाद - चंद्रकांत खैरै, खासदार जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी खैरेंना परत उमेदवारी देण्यावरुन विरोध दर्शवला आहे. त्यामुळे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरै यांच्यात प्रचंड तणाव सुरु आह. रायगड - अनंत गीते, केंद्रीय मंत्री अनंत गीते हे जरी केंद्रीय मंत्री असले तरी त्यांना परत जिंकवायचं कसं? हा सवाल रायगडच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला आहे. त्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुनील तटकरे हे मागच्या वेळी काही मतांनी पराभूत झाले होते. यावेळी ते रायगड पिंजून काढत आहेत. गीतेंचं काय करायचं? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. यवतमाळ - भावना गवळी, खासदार मंत्री संजय राठोड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे भावना गवळींविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मावळ - श्रीरंग बारणे, खासदार एकीकडे अजित पवारांचे पुत्र मावळमधून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे तर दुसरीकडे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप बारणेंविरोधात असल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे शिर्डी - सदाशिव लोखंडे, खासदार आपले खासदार मतदार संघात फिरकलेच नाही, अशी तक्रार जनतेची नाही तर चक्क कार्यकर्त्यांनी केली आहे. सातारा - तानाजी सावंत या लोकसभेच्या जागेवर शिवसेनेने भाजपला मदत करावी त्याबदल्यात शिवसेनेने तानाजी सावंत यांना माढामध्ये शरद पवार यांच्याविरोधात लढवावं, असं मत कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर मांडलं आहे. अमरावती - आनंदराव अडसूळ, खासदार या मतदारसंघात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आनंदराव अडसूळ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. VIDEO | मंत्रीपद, उमेदवारी कोणाला द्यायची? उद्धव ठाकरेंपुढे मोठा पेच