धाराशिव : लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत होता.  त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला याचा चांगलाच फटका बसला होता. मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघात भाजप महायुतीचा पराभव झाला. छत्रपती संभाजीनगर वगळता एकाही लोकसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळालं नाही. भाजपच्या दिग्गज नेत्यांना मराठवाड्यात पराभव पत्करावा लागला होता. यामध्ये पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांचा देखील समावेश आहे. 


धाराशिव ब्रेकिंग 


परंडा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर महायुतीचे तानाजी सावंत 529 मतांनी पिछाडीवर 


उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघात चौथी फेरी अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कैलास पाटील 1632 मतांनी आघाडीवर 


तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे राणाजगजीतसिंह पाटील तिसऱ्या फेरी अखेर 4157 मतांनी आघाडीवर 


उमरगा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी 2669  मतांनी आघाडीवर


दरम्यान, लोकसभा निडवणुकीनंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत येथे काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. धाराशिव जिल्ह्यात एकूण 4 मतदारसंघ येतात. त्यामध्ये, तुळजापूर आणि कळंब- धाराशिव, परांडा, उमरगा या मतदारसंघांचा समावेश आहे.  


बीड जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी  


1.तुळजापूर - 
2.कळंब- धाराशिव-
3.परांडा-
4.उमरगा-


चार विधानसभा मतदारसंघात कोणाची लढत कोणाविरोधात? 


1. कळंब धाराशिव - कैलास पाटील , ठाकरे गट विरुद्ध  अजित पिंगळे ,शिंदे गट


2. परांडा - राहुल मोटे , शरद पवार गट विरुद्ध  तानाजी सावंत , शिंदे गट 


3. तुळजापूर  -  धीरज पाटील,काँग्रेस  विरुद्ध राणा पाटील ,भाजप 


4. उमरगा - प्रवीण स्वामी, ठाकरे गट विरुद्ध  ज्ञानराज चौगुले ,शिंदे गट  


धाराशिव जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये एका दोन विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली. एका मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत झाली. 
शिवाय एका मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे.


2019 चे विजयी उमेदवार 


1. कळंब धाराशिव -  कैलास पाटील


2. परांडा  - तानाजी सावंत 


3. तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील 


4. उमरगा -  ज्ञानराज चौगुले


कळंब धाराशिव मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार कैलास पाटील मैदानात होते 


तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने धीरज पाटील हे उमेदवार होते.  काँग्रेसने मधुकरराव चव्हाण यांचे तिकीट कापले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने स्नेहा सोनकाटे यांना मैदानात उतरवले होते. 


परांडा विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेने मंत्री तानाजी सावंत यांना मैदानात आहे. तर त्यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राहुल मोटे यांना उमेदवार दिली होती.  उद्धव ठाकरेंनी रणजीत पाटील यांना एबी फॉर्म दिला होता, मात्र, ऐनवेळी त्यांना माघार देखील घेण्यास सांगण्यात आले होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Maharashtra Exit Poll : महायुतीची झोप उडवणारा 'एबीपी माझा'चा पोल समोर, सोशल मीडियावर लोकांचा मूड काय?