मुंबई : धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या पातळीवर कलेल्या टीकेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिला आयोग धनंजय मुंडे यांना याप्रकरणी नोटीस पाठवणार आहे. धनंजय मुंडेच्या विधानावरुन राज्य महिला आयोगाने सुमोटो दाखल करुन घेतली आहे.


धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत केलेलं वक्तव्य अशोभनीय आणि लज्जास्पद आहे. पंकजा मुंडे या राज्याच्या मंत्री आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचंच आहे. धनंजय मुंडेंचं वक्तव्य कोणत्याही महिलेला लज्जा उत्पन्न करणारं असल्याचं आयोगाच्या प्रथम दर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे राज्य महिला आयोगाने दखल घेत सुमोटो दाखल करुन घेतली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी सांगितलं.




धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल


परळी मतदार संघातील लढत लक्षवेधी झाली असून आरोप प्रत्यारोप झाल्याने निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांना भोवळ येऊन त्या खाली पडल्या. यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातून धनंजय मुंडे यांनी जे भाषण केले त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.


धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्याच्या धक्क्याने पंकजा मुंडे कोसळल्या? | परळी | ABP Majha


'धनंजय मुंडे मुर्दाबाद' अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी थेट परळी पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल करत अटकेची मागणी करीत घोषणाबाजी केली होती. जोवर गुन्हा दाखल होत नाही, तोवर पंकजा मुंडे समर्थक पोलीस स्थानकातच ठाण मांडून बसले होते. अखेर जुगल किशोर लोहिया यांच्या तक्रारीवरुन परळी शहर पोलीस ठाण्यात अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे 509, 294, 500 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Pankaja Munde | पंकजा मुंडे सभेदरम्यान चक्कर येऊन स्टेजवरच कोसळल्या | बीड | ABP Majha


संवंधीत बातम्या