बीड : तुमच्याही चिक्की आणि मोबाईलची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या, एकदाच दूध का दूध और पानी का पानी होवू द्या, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं आहे. निवडणुकांच्या तोंडावर मुंडे बहीण-भावामध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

एक काम करा ना ताई, कुणी कशात तोडपाणी केली याची साधी सोपी चौकशी करा. जर विरोधी पक्षनेता म्हणून मी तोडपाणी केली असेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हीही राज्याच्या मंत्री आहात, तुमच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत. काय चौकशी करायची असेल ती करा. त्यासोबत तुमच्याही चिक्की आणि मोबाईलची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या. एकदाच दूध का दूध और  पानी का पानी होऊ द्या, असं धनंजय मुंडे म्हणाले.

आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्कीत खाल्लेले पैसे शेतकऱ्यांना दिलेले बरे, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला

'सात वर्ष झाली, या राजकारणासाठी 100 एकर जमीन विकावी लागली आणि तुम्ही म्हणता आम्ही तोडपाणी केली.' अशा शब्दात धनंजय मुंडेंनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीतर्फे महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी बीडमधील शिरुर कासारमध्ये आयोजित जाहीर सभेत धनंजय मुंडे बोलत होते. सोनावणेंविरोधात बीडमधून पंकजा मुंडेंची भगिनी आणि भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे पुन्हा रिंगणात आहेत.

VIDEO | पंतप्रधानांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया | वर्धा



वैद्यनाथ साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट करण्यासाठी मी माझ्या आईचे पैसे दिले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. यावर बोलताना आईचे पैसे देण्याऐवजी तुम्ही पाच वर्षात कमावलेले पैसे शेतकऱ्यांना का देत नाही? असा उपरोधिक सवालही धनंजय मुंडेंनी विचारला होता.

तुम्ही लहान लेकरांच्या चिक्कीत खाता, मोबाईलमध्ये खाता, मग मुंडे साहेबांचा वारसा हाच चालवता का? असा बोचरा सवालही धनंजय मुंडेंनी पंकजा यांना विचारला.