मुंबई : परळीची जनता गेली २४ वर्षे ओळखत आहे. मी पंकजा मुंडे यांच्याविरोधात कोणतेही वादग्रस्त वक्त्व्य केलं नाही. भावाला बदनाम करण्याचं षडयंत्र असून माझ्यासाठी हा विषय त्याचं दिवशी संपला असून आता संपूर्ण निर्णय परळीच्या जनतेवर सोडला आहे. माझ्या जीवनात फार कमी वेळा अश्रू आले आहे. तो प्रसंगच असा होता की माध्यमांशी बोलताना अचानक भावूक झालो अशा शब्दांत ‘एबीपी माझा’शी बोलताना राष्ट्रवादीचे परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त तरूण चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरूणांचा उत्साह वाढला असून नक्कीच तरूणाईची मते वाढण्यास मदत होईल, असे  मुंडे म्हणाले, आकड्यांच्या खेळात मी पडणार नाही. निवडणुकीच्या निकालाअगोदर आकडे जाहीर करण्यात मला देखील रस नाही. पण राष्ट्रवादी या निवडणुकीत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर नक्कीच असणार आहे. राष्ट्रवादीचे जे गड आहे ते राष्ट्रवादी राखणारचं आहे पण त्याचबरोबर महायुतीचे गड देखील या निवडणुकीत राष्ट्रवादी काबीज करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

निवडणुकीच्या तोंडावर ज्या उमेदवारांनी पक्षांतर केले त्यांच्याविषयी बोलताना मुंडे म्हणाले, पक्षांतर केलेल्या उमेदवारांविषयी जनतेच्या मनात रोष आहे. जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड राग असून मताच्या माध्यमातून तो व्यक्त होणारच आहे. निवडणुकीच्या तोडांवर पक्षांतर केलेल्या उमेदवारांना याचा फटका बसणार आहे.