Rayat Kranti Sanghatana : महाराष्ट्र राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यांमुळं राज्यात महायुतीचीच पुन्हा सत्ता येणार आहे. मात्र, राज्यात नवा मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून रयत क्रांती संघेटनेच्या (Rayat Kranti Sanghatana) कार्यकर्त्यांनी पंढरपूरच्या विठुरायाला दुग्धाभिषेक करुन पेढे वाटत साकडं घातलं आहे. 


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्याच्या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले व पदाधिकाऱ्यांनी नामदेव पायरी जवळ विठुरायाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला. देवेंद्र फडणवीस हेच खरे बहुजन उद्धारक असून शेतकऱ्याची जाण केवळ त्यांना आहे. शेतकरी कर्जमुक्तीसाठी फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे विठुरायाला घातल्याचे रयत क्रांती संघटनेचे नेते दीपक भोसले यांनी सांगितले.  यावेळी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिर परिसरातील भाविकांना आणि नागरिकांना पेढ्यांचे वाटप केले. 


नवीन मुख्यमंत्र्याचा शपथविधी कधी होणार? 


नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra CM Oath-Taking Ceremony) 26 तारखेला होणार अशी चर्चा होती, मात्र आता सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं समजतयं. नुकताच मिळालेल्या माहितीनूसार महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी 29 नोव्हेंबरला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्यात भाजपचे 25 आमदार, तर शिवसेना शिंदे गटाचे 5 ते 7 आमदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 5 ते 7 शपथ घेतली जाणार आहे. 


मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे 


महाराष्ट्रातील मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी निवडणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु आता नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नव्हे, तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार, याचा निर्णय घेणार आहेत. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार, ही निवडण्याची मोठी जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे आहे. आज संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत भाजपला मिळालेले मोठे यश आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मिळालेल्या यशानंतर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब होणार आहे.


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Next CM: नरेंद्र मोदी, अमित शाह नव्हे...महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण निवडणार?, अखेर नाव आलं समोर, 29 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणार