Maharashtra New CM: महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून येत्या 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रिपदाचं नाव अद्याप जाहीर केलं नसलं तरीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे. 


मुंबईतील आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यासाठीचा भव्य दिव्य मंच आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे. आझाद मैदानावरती 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी साधारणतः 30 ते 40 हजार लोक अपेक्षित आहेत. त्या अनुषंगाने आझाद मैदानात एकुण 3 स्टेज असणार आहे. दरम्यान या शपतविधी सोहळ्यासाठी देशभरातली दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी नागपुरातील एक 'चहावाला' या शपतविधी सोहळ्यासाठी विशेष उपस्थित असणार आहे.  


देवेंद्र फडणवीसांच्या 'या' चाहत्याला विशेष निमंत्रण


मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी जवळपास 40 हजार जणांची उपस्थिती असणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तसेच देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्री देखील या वेळी सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. सोबतच लाडक्या बहि‍णींना ही विशेष आमंत्रण शपथविधीसाठी देण्यात येणार आहे. जवळपास दोन हजार व्हीव्हीआयपींच्या पासेसची सोय करण्यात आली आहे. या सगळ्यात नागपुरातील एक 'चहावाला' महायुती आणि भाजपच्या शपथविधीला जाणार आहेत. नागपुरात चहाचा स्टॉल चालवणारे गोपाल बावनकुळे (Gopal Bawankule) हे देवेंद्र फडणवीस यांचे मोठे फॅन आहेत. शहरातील रामनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून गोपाळ यांचा चहाचा स्टॉल आहे. दरम्यान, या चहाच्या स्टॉल वर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ही आहे. अशातच मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या या शपथविधीसाठी गोपाळ यांना निमंत्रण आल्याने ते देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.  


नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची महातयारी


मुख्य स्टेज हा 60 बाय 100  बाय ८ फुट असणार आहे. या मंचावर पंतप्रधान आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री असतील. तर उजव्या बाजूला 80 बाय 50  बाय 7 फुट लांबीचा मंच असेल. यावर सर्व साधू संत बसतील. तर डाव्या बाजूला 80 बाय 50 बाय 7 फुटाचा एक स्टेज असेल. या मंचावर छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असेल आणि साऊंड सिस्टीम या ठिकाणी असणार आहे. मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला खासदार आणि आमदार यांची बसण्याची व्यवस्था केली आहा. त्यासाठी 400 खुर्च्या असणार आहे. बाजूला आणि मुख्य मंचाच्या समोर VVIP यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास 1000 खुर्ची या ठिकाणी असणार आहे.  


डाव्या बाजूला महायुतीमधील मुख्य पदाधिकारी यांच्यासाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. तर कार्यकर्त्यांसाठी सात विभागात बसण्याची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. संपुर्ण मंचाचा बाजूला 6 बाय 16 उंचीचे कटआउट लावले जातील. कार्यकर्ते यांच्यासाठी एकुण तीन प्रवेशद्वार असणार आहे. मुंबई महापालिका समोर हे प्रवेशद्वार असणार आहे. व्हीआयपी यांच्यासाठी एकुण तीन प्रवेशद्वार असतील. फॅशन स्ट्रीट कडून व्हीआयपीनी प्रवेश दिला जाईल. 


संबंधित बातमी: