मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी' आणि ''ए.सी. नेल्सन'' यांनी केलेलं सर्वेक्षण समोर आले आहे. 48 मतदारसंघात 12 हजार मतदारांपर्यंत पोहोचून नेल्सनच्या प्रतिनिधींनी हा सर्व्हे केला आहे. निवडणुका घोषित होण्याचा आणि उमेदवार ठरण्याच्या काळात हा सर्व्हे केला गेला. या सर्व्हेत मतदारांना आपल्या नेत्यांकडून अपेक्षा काय आहेत? विकासाचे मुद्दे, कोण जिंकेल? असे प्रश्न विचारण्यात आले होते.


VIDEO | उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही | कौल मराठी मनाचा | मूड महाराष्ट्राचा | एबीपी माझा

या सर्व्हेमध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपचा वरचश्मा पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपची नंदुरबारची जागा हातून निसटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र बाकी 6 पैकी 4 जागांवर भाजपची सरशी असल्याचे पाहायला मिळत आहे. धुळे, जळगाव, रावेर या जागांवर भाजप पुन्हा निवडून येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

VIDEO | उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही | कौल मराठी मनाचा | मूड महाराष्ट्राचा | एबीपी माझा



उत्तर महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार

नंदुरबार :- काँग्रेस

धुळे :- भाजप

रावेर :- भाजप

दिंडोरी :- भाजप

नाशिक :- शिवसेना

जळगाव :- भाजप


उत्तर महाराष्ट्रात कुणाला किती जागा


भाजप :-  4

शिवसेना :-  1

काँग्रेस :- 1




मराठवाड्यात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार


या सर्व्हेमध्ये मराठवाड्यातील 8 जागांपैकी भाजप 3,  शिवसेना 2,  काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी एका जागेवर बाजी मारेल असा अंदाज व्यक्त केला आहे.  यामध्ये शिवसेनेचा गड असलेला परभणी शिवसेनेच्या हातून सुटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
हिंगोली- काँग्रेस

जालना -भाजपा

औरंगाबाद - शिवसेना

नांदेड- काँग्रेस

परभणी- राष्ट्रवादी

बीड - भाजप

उस्मानाबाद - शिवसेना

लातूर - भाजप



विदर्भातील मतदारसंघात कोण बाजी मारणार



या सर्व्हेमध्ये विदर्भात असलेल्या 10 लोकसभा मतदारसंघात भाजपचा वरचष्मा झालेला पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपला 6, शिवसेनेला 3 आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्वेनुसार अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनाही धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर नागपुरातून नितीन गडकरी यांचा विजय होणार असून भंडारा गोंदियाची जागा राष्ट्रवादीच्या हातून सुटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
बुलढाणा - शिवसेना

अकोला - भाजप

अमरावती - शिवसेना

वर्धा- भाजप

रामटेक- काँग्रेस

नागपूर - भाजप

यवतमाळ/वाशीम - शिवसेना

चंद्रपूर - भाजप

भंडारा / गोंदिया  - भाजप

गडचिरोली / चिमूर - भाजप


2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची टक्केवारी


एनडीए - 49.6  टक्के

युपीए - 36.9  टक्के

अन्य - 13. 5 टक्के


2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात होणाऱ्या मतदानाची टक्केवारी (अंदाज)

एनडीए :-  48 टक्के

युपीए :- 37 टक्के

वंचित आणि अन्य :- 2 टक्के

इतर :- 13टक्के