Prithviraj Chavan on EVM : भविष्यात ईव्हीएमऐवजी  (EVM) बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला हव्यात, असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं. ईव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅटचा (VVPAT) निकाल एकच आहे, तर मग व्हीव्ही पॅटमधील सर्व चिठ्ठ्या मोजायला हव्यात. हे करायला सरकार का घाबरत आहे? असा सवाल देखील चव्हाण यांनी केला. EVM मध्ये गडबड आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर EVM ची तपासणी करावी असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.  


लोकसभेतील निकाल आणि विधानसभेचा निकाल यात मोठी तफावत 


100 टक्के व्हीव्ही पॅट मधील चिठ्ठ्या मोजा. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञांकडून ईव्हीएम मशीनची तपासणी करायला हवी हीच आमची प्रमुख मागणी आहे. तेव्हाच जनतेचा 100 टक्के विश्वास निवडणूक आयोगावर बसेल असेही चव्हाण म्हणाले. राज्यातील निकाल अनपेक्षित लागलेत. एखादी हवा असेल तर नक्कीच उमेदवारांना अंदाज येतो, तेव्हा असा निकाल मानला जातो. पण लोकसभेतील निकाल आणि विधानसभेचा निकाल यात मोठी तफावत आहे. लोकसभा आणि विधानसभेतील मतदानाची टक्केवारी पाहता, हा बदल शंशयास्पद आहे. लोकसभेतील ज्या मतदारांनी महायुती विरोधात मतदान केलं, तेचं मतदार 4 महिन्यात त्यांच्या बाजूनं कसं काय मतदान करू शकते? असा सवाल यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या ईव्हीएम विरोधी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. त्यांना माझा आणि काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलो असल्याचे चव्हाण म्हणाले. 


पंतप्रधान आणि अमित शाह यांच्या संमतीनेचं निवडणूक आयोगाचे अधिकारी नेमले जाणार असा कायदा


निवडून आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह या दोघांच्या संमतीनेचं निवडणूक आयोगाचे अधिकारी नेमले जातील, असा कायदा लोकसभेत पारित केला गेला. तेव्हाच आम्हाला वाटलं होतं, आता निवडणुका पारदर्शी होणार नाहीत? अशी शंका आम्हाला मनात आली होतीच, अपेक्षेनुसार हेचं घडल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.  


ईव्हीएम मध्ये गडबड, याबाबतचा ठोस पुरावा मिळणं कठीणो


ईव्हीएममध्ये गडबड आहे. पण याबाबतचा ठोस पुरावा मिळणं कठीण असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मशीनमध्ये टेम्परिंग केलं असेल तर कसं सिद्ध होणार? मुळात ईव्हीएम मशीन विरोधकांच्या हातात द्याव्यात ना? शरद पवार गटाला लोकसभेत मिळालेलं यश पाहता विधानसभेत इतकं अपयश मिळेल का? याचं संशोधन सुद्धा करायची गरज नाही असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.  


महत्वाच्या बातम्या:


EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान