मोदी म्हणाले की, अनेक माध्यमांनी पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अनेक एक्झिट पोल्सही तसेच संकेत देत आहेत. काँग्रेसने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत सर्वात कमी म्हणजेचे 44 जागा जिंकल्या. तर यंदा त्यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी जागा लढवण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे यंदा त्यांच्या खासदारांची संघ्या 44 वरुन 50 पर्यंत वाढण्याऐवजी 40 पर्यंतचे अडकेल, अशी चर्चा सुरु आहे.
दरम्यान, "कसं काय मुंबई? सगळं काही ठीक आहे ना?" असं विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लौकिकानुसार आज मराठीत भाषणाला सुरुवात केली. मुंबादेवी, सिद्धिविनायक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन मोदींनी भाषणाला सुरुवात केली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा 'माझे लहान भाऊ उद्धव ठाकरेजी' असा उल्लेख करायलाही ते विसरले नाहीत.
UNCUT VIDEO | काँग्रेस म्हणजे कन्फ्युजनचं दुसरं नाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण | मुंबई | एबीपी माझा
आजच्या सभेला, मोदींसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.