मुंबई : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील 26 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील संजय निरुपम यांचा या यादीत समावेश आहे.

संजय निरुपम यांना मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निरुपमांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे, मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर त्यांना पाणी सोडावं लागलं आहे. निरुपमांच्या जागी आता मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राज्यातील आणि खासकरुन मुंबईत काँग्रेस नेत्यांचा संजय निरुपमांना विरोध असल्याची चर्चा होती. त्यामुळे संजय निरुपमांना उमेदवारी जाहीर करण्यास विरोध होत होता. मात्र, आज अखेर राहुल गांधी यांनी निरुपम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे शिवसेनेचे गजानन किर्तीकर आणि संजय निरुपम यांचा निवडणुकीत सामना होणार आहे.

VIDEO | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया | एबीपी माझा 

मिलिंद देवरा यांना खूप खूप शुभेच्छा : संजय निरुपम

"माझ्यावर विश्वास ठेवून मला मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याबद्दल राहुल गांधींचे आभार मानतो", अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली. विभागातील सर्व कार्यकर्त्यांना व लोकांना सोबत घेऊन संपूर्ण ताकदीने निवडणूक लढून जिंकून दाखवीन, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला आहे.

"गेली चार वर्षे मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो. या कालखंडात मी काँग्रेस पक्षासाठी जे योग्य होते ते सगळी कामे यशस्वीरित्या मनापासून पार पाडली. काँग्रेस पक्षासाठी दिवस रात्र खूप काम केले. मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद देवरा यांना खूप शुभेच्छा आणि मिलिंद देवरा यांचे मनापासून अभिनंदन, असं संजय निरुपम यांनी म्हटलं.

काँग्रेसची उमेदवार यादी

  1. नंदुरबार - के. सी. पडवी
  2. धुळे - कुणाल रोहिदास पाटील
  3. वर्धा - चारुलता टोकस
  4. मुंबई दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड
  5. यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे
  6. शिर्डी- भाऊसाहेब कांबळे
  7. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नवीनचंद्र बांदिवडेकर
  8. नागपूर - नाना पटोले
  9. सोलापूर - सुशीलकुमार शिंदे
  10. मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त
  11. मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा
  12. गडचिरोली-चिमूर - डॉ. नामदेव उसेंडी
  13. चंद्रपूर- सुरेश (बाळू) धानोरकर
  14. जालना- विलास औताडे
  15. औरंगाबाद- सुभाष झांबड
  16. भिवंडी - सुरेश टावरे
  17. लातूर- मच्छिंद्र कामनात
  18. नांदेड- अशोक चव्हाण
  19. रामटेक- किशोर गजभिये
  20. हिंगोली- सुभाष वानखेडे
  21. अकोला- हिदायत पटेल
  22. मुंबई उत्तर पश्चिम - संजय निरुपम

व्हिडीओ - 'पुन्हा गरीबी हटाओ' कॉंग्रेसला तारणार? | माझा विशेष

संबंधित बातम्या

काँग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात विनायक बांगडेंऐवजी सुरेश धानोरकरांना उमेदवारी

काँग्रेसकडून उमेदवारांची आठवी यादी जाहीर, नांदेड लोकसभेसाठी अखेर अशोक चव्हाणांनाच उमेदवारी

लोकसभा निवडणूक : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा

लोकसभा निवडणूक : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट