भाजपच्या एका बड्या नेत्याची ऑफर होती. भाजपचा संबंधित नेता माझ्या तोडीचा होता, असं सांगतानाच सुशीलकुमार शिंदेंनी त्यांचं नाव घेणं मात्र टाळलं. आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर फेटाळून लावली, असंही सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं.
सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या सोलापुरातून काँग्रेस आमदार आहेत. प्रणिती यांनाही वारंवार भाजपप्रवेशाच्या ऑफर येत असल्याचा दावा सुशीलकुमार शिंदेंनी केला.
VIDEO | भाजप प्रवेशाची ऑफर होती, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट | सोलापूर | एबीपी माझा
दरम्यान, तरुणांना स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी सुजय विखे-पाटील यांनी पक्षांतर करणं गैर नसल्याचं सांगितलं होतं.
सुजय विखेंच्या भाजपप्रवेशाबाबत बोलताना सुशीलकुमार म्हणाले होते की, प्रत्येकाला करिअर करायचं असतं. तिकीटवरुन नाराजी म्हणून तरुण पक्ष बदलत आहेत. वैचारिक भूमिका आहे पण मुलांना स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसचे प्रामाणिक नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही.