मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर
त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रतिभा धानोरकर रिंगणात उतरणार आहे. चंद्रपुरात काँग्रेसकडून उमेदवारी रविवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याआधी भाजपने चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील चंद्रपुरातील लढत फार महत्त्वाची ठरणार आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रतिभा धानोरकर रिंगणात
पाचव्या यादीमध्ये तीन उमेदवारांना तिकीट
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. पाचव्या यादीमध्ये तीन उमेदवारांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एक आणि राजस्थानमधील दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या पाचव्या यादीमध्ये चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर यांना खासदारकीचं तिकीट देण्यात आलं आहे.
जयपूर आणि दौसामधील काँग्रेस उमेदवार जाहीर
यासोबतच, राजस्थानमध्ये जयपूर लोकसभा मतदारसंघात (Jaipur Lok Sabha Constituency) प्रताप सिंह खाचरियावास (Pratap Singh Khachariyawas) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबतच दौसा मतदारसंघातून (Dausa Constituency) मुरारी लाल मीना (Murari Lal Meena) यांना काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेस उमेदवारांची पाचवी यादी
- महाराष्ट्र - चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर
- राजस्थान - जयपूर - प्रताप सिंह खाचरियावास
- राजस्थान - दौसा - मुरारी लाल मीना