अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमच्या भावाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदमने मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएमची पूजा केली होती. या प्रकरणी श्रीकांत छिंदमसह आणखी 8 जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
श्रीकांत छिंदमविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. श्रीकांत छिंदमने काल अहमदनगर महापालिकेच्या मतदानादरम्यान ईव्हीएमची विधीवत पूजा केली होती.
वादग्रस्त श्रीपाद छिंदम हा वॉर्ड क्रमांक 9 मध्ये अपक्ष उमेदवार आहे. मात्र त्याला तडीपार करण्यात आले आहे. याच वॉर्ड क्रमांक 9 मध्ये असलेल्या मतदान केंद्रात श्रीपादचा भाऊ श्रीकांतने पूजा केली होती. यामुळे अहमदनगरमध्ये चर्चेला उधाण आले होते.
यावर बोलताना हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे असं म्हणून भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी या प्रश्नाला बगल दिली होती.
अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक झाली असून यामध्ये 351 उमेदवार मैदानात आपले नशीब आजमावणार आहेत. आज या निवडणुकीचा निकाल असल्याने सर्वांचे लक्ष या निकालाकडे आहे.
या निवडणुकीत खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि कॉंग्रेसचे युवा नेते सुजय विखे यांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली होती. त्यामुळे कधीही महानगरपालिकेत महापौर पद न मिळवलेल्या भाजपला एकहाती सत्ता मिळणार की राष्ट्रवादी आणि शिवसेना आपला झेंडा रोवणार हे पाहावे लागणार आहे.
ईव्हीएमची पूजा, छिंदमच्या भावाविरूध्द गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Dec 2018 08:14 AM (IST)
श्रीकांत छिंदमविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. श्रीकांत छिंदमने काल अहमदनगर महापालिकेच्या मतदानादरम्यान ईव्हीएमची विधीवत पूजा केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -