काम नसल्याने रात्रभर यूट्यूब पाहतात आणि 'लाव रे व्हिडिओ' म्हणतात, मुख्यमंत्र्यांची बोचरी टीका
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2019 11:42 PM (IST)
यांना सध्या काही काम नसल्याने हे रात्रभर यूट्यूबवर व्हिडीओ पाहत बसतात आणि मग 'लाव रे व्हिडीओ लाव रे व्हिडीओ' करतात. पण यांचे व्हिडीओ पाहून जनतेने यांना विधानसभेतूनच नव्हे, तर महापालिकेतूनही घरी बसवलं, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली.
डोंबिवली : सध्या काही काम नसल्याने हे रात्रभर यूट्यूबवर व्हिडीओ पाहत बसतात आणि मग 'लाव रे व्हिडीओ लाव रे व्हिडीओ' करतात. पण यांचे व्हिडीओ पाहून जनतेने यांना विधानसभेतूनच नव्हे, तर महापालिकेतूनही घरी बसवलं, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली. काँग्रेस, राष्ट्रवादीकडे सध्या बोलायला वक्ते राहिलेले नसल्याने वक्ते भाड्याने घेतले जात आहेत. पूर्वी आपण जशी सायकल भाड्याने घ्यायचो, तसं आता इंजिन भाड्याने घेत आहेत, मात्र तोंडाच्या वाफेवर इंजिन चालत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. VIDEO | आंबा खाण्यावरुन राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला यांना सध्या काही काम नसल्याने हे रात्रभर यूट्यूबवर व्हिडीओ पाहत बसतात आणि मग 'लाव रे व्हिडीओ लाव रे व्हिडीओ' करतात. पण यांचे व्हिडीओ पाहून जनतेने यांना विधानसभेतूनच नव्हे, तर महापालिकेतूनही घरी बसवलं, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली. राष्ट्रवादीचे साहेब पिचवर न उतरताच पॅव्हेलीयनमध्ये परतले, त्यामुळे राष्ट्रवादीने निवडणूक सोडून दिल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. डोंबिवलीच्या फडके रोडवर झालेल्या या सभेला पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप, शिवसेनेचे आमदार, लोकप्रतिनिधी आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीच्या गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.