Exit Poll Result 2024 चंद्रपूर : देशात गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज अखेर संपुष्टात आली आहे. देशात आज शनिवारी लोकसभेचे (Lok Sabha Election 2024) सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले. हे मतदान संपत असताना सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल्सची.(Exit Poll 2024) त्यातच महाराष्ट्रातील 48 जागांवर कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी वरचढ ठरणार, याचा अंदाज विविध एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
अशातच या निवडणुकांची रणधुमाळी ज्या विदर्भापासून सुरुवात झाली त्या पूर्व विदर्भात प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात (Chandrapur Lok Sabha Election 2024) भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे पिछाडी वर असल्याचा अंदाज टिव्ही 9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार सांगण्यात आले आहे. तर महविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आघाडीवर असून 2014 आणि 2019 प्रमाणेच काँग्रेस गड अभेद्य ठेवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसचा गड अभेद्य राहणार
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यापासून प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगतान दिसत होती. सोबतच 2019 मध्ये याच मतदारसंघात काँग्रेस दिवंगत नेते बाळू धानोरकर यांनी राज्यात एकमेव दणदणीत विजय मिळवत एकप्रकारे राज्यात काँग्रेसची लाज राखली होती. त्यामुळे अबकी बार चारसो पारचा नारा देणाऱ्या भाजपला या मतदारसंघातून विजय संपादन करणे फार महत्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्रातील प्रचारचे रणशिंग देखील चंद्रपूरातून फुंकले होते. मात्र, असे असले तरी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदारांवर पूर्ण विश्वास दर्शवत आपला बहुमताने विजय होईल, असा विश्वास वेळो वेळी बोलून दाखवला आहे.
परिणामी, TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार चंद्रपूरमध्ये मविआच्या उमेदवार काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत. तर भाजपचे सुधीर मुनगंटीवर पिछाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोल हे फक्त अंदाज असून तो निकाल नव्हे. म्हणून आम्ही आघाडी, पिछाडी असे म्हणत असल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता 4 जूनला मात्र अंतिम निकाल नेमका काय लागेल या कडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या