Chandrapur Lok Sabha Election Result 2024: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात (Chandrapur Lok Sabha Election Result 2024) काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचा पराभव केला आहे. प्रतिभा धानोरकर यांना एकूण 7 लाख 18 हजार 410 मत मिळाली, सुधीर मुनगंटीवार यांना 4 लाख 58 हजार 004 मत मिळाली. प्रतिभा धानोरकर यांनी 2 लाख 60 हजार 406 मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत, त्या मतदारसंघातूनही प्रतिभा धानोरकर यांना मताधिक्य मिळालं.

विधानसभा निहाय उमेदवारांना मिळालेली मतं

राजुरा मतदारसंघ

धानोरकर : 130554
मुनगंटीवार : 71,651
काँग्रेसला मताधिक्य : 58903

चंद्रपूर मतदारसंघ

धानोरकर : 119811
मुनगंटीवार : 80484
काँग्रेसला मताधिक्य : 39327

बल्लारपूर मतदारसंघ

धानोरकर : 121652
मुनगंटीवार : 73452
काँग्रेसला मताधिक्य : 48200

वरोरा मतदारसंघ

धानोरकर : 104752
मुनगंटीवार : 67702
काँग्रेसला मताधिक्य : 37050

वणी मतदारसंघ

धानोरकर : 125781
मुनगंटीवार : 69133
काँग्रेसला मताधिक्य : 56648

आर्णी मतदारसंघ

धानोरकर : 114085
मुनगंटीवार : 94521
काँग्रेसला मताधिक्य : 19564

चंद्रपूर लोकसभा निकाल 2024 (Chandrapur Lok Sabha Election 2024)

                                      उमेदवाराचे नाव                                              पक्ष                                 विजया कोणाचा?
                                     सुधीर मुनगंटीवार                                            भाजप                                    पराभव
                                     प्रतिभा धानोरकर                                            काँग्रेस                                     विजयी

सुधीर मुनगंटीवार की प्रतिभा धानोरकर, गुडन्यूज कुणाला? 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये काँग्रेस दिवंगत नेते बाळू धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवत एकप्रकारे राज्यात काँग्रेसची लाज राखली होती. मात्र त्यानंतर खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. त्यामुळे आता या मतदारसंघावर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र त्यांच्या विरोधात त्यांच तोडीचे उमेदवार म्हणून भाजपने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली होती. चंद्रपूर मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली होती. 

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Chandrapur Lok Sabha Voting Percentage 2024)

एकूण मतदान-  67.57

राजुरा- 66.99 टक्के
चंद्रपूर- 58.43 टक्के
बल्लारपूर- 68.74 टक्के
वरोरा- 67.74 टक्के
वणी- 73.17 टक्के
आर्णी- 69.52 टक्के

चंद्रपूरच्या कमी मतदानाचा फटका कुणाला?

शहरी मतदार हा लोकशाही व्यवस्थेबद्दल जागरूक असतो, असे बोलले जाते. मात्र, ग्रामीण भागाच्या तुलनेत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मतदान केवळ 58.43 टक्क्यांवर थांबले. कुणाचा तडाखा सहन करून राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी या ग्रामीण क्षेत्रातील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. या तुलनेत चंद्रपुरातील मतदार पिछाडीवर गेला. त्यामुळे कमी मतदान देणारे चंद्रपूर विधानसभा क्षेत्र कुणाच्या विजयाचे गणित बिघडविणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

राजुरा- सुभाष धोटे, काँग्रेस
चंद्रपूर-  किशोर जोरगेवार, अपक्ष
बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार, भाजप
वरोरा- प्रतिभा धानोरकर, काँग्रेस
वणी- संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप
आर्णी- संदीप धुर्वे, भाजप

2019 सालचा निकाल (Chandrapur Lok Sabha Election 2019)

1998-99 मध्ये काँग्रेस जिंकली. 2004 ते 2014 पर्यंत ही जागा भाजपच्या ताब्यात राहिली आणि येथून हंसराज अहिर हे खासदार होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे येथून सुरेश नारायण धानोरकर भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करुन विजय मिळवला.

पहिले काँग्रेसचे खासदार विजयी

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत. हा ऐतिहासिक आणि जुना जिल्हा असल्याने 1951-1952 मध्ये देशात पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा या जागेचाही त्यात समावेश करण्यात आला. मुल्ला अब्दुल्लाभाई ताहेरअली हे काँग्रेस पक्षाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले.