सातारा : रात्री घरी जाताना एक खडू घेऊन जा आणि आपल्या घरातल्या भिंतीवर धनुष्यबाणाचे चिन्ह काढा आणि त्याच्याखाली लिहा 'उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच' मग बघा कशी एनर्जी येते असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.


भिंतीवर पुसल्या जाणाऱ्या खडूने  'उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच' असं लिहायचं आणि रोज घरातून बाहेर पडताना भाजप आणि शिवसेनेचा बॅच खिशाला लावूनच घराबाहेर पडायचं, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी खास उपाय उदयनराजेंना पाडण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगितला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी साताऱ्यातील वाई येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही टोला लगावला. शेवटच्या दिवशी शरद पवार बारामतीत सभा घ्यायचे आता तेच शरद पवार आपल्या पोरीसाठी मतदारसंघात चार-चार सभा घेत आहेत, असे ते म्हणाले.

सातारा मतदारसंघातून शिवसेनेकडून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.

नरेंद्र पाटील माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आहेत. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण इथे माथाडी मतदारांवर नरेंद्र पाटील यांची पकड आहे. मराठा मोर्चे निघाला होते, त्यात सातारा पट्ट्यातील लोकांचा सर्वाधिक समावेश होता. त्यामुळे ही मतं नरेंद्र पाटील यांना मिळतील अशी अपेक्षा आहे.

राज्य सरकारने यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकासमंडळाचं अध्यक्षपद दिल्यानंतर नरेंद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला होता.

VIDEO | खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा
संबंधित बातम्या

छत्रपती शिवरायांचे 'हे' गुण माझ्यामध्ये आयुष्यभर राहावेत : उदयनराजे भोसले


कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाला तेव्हा भिडे गुरुजी तिथे नव्हतेच, उदयनराजे भोसलेंचा दावा


VIDEO | खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा


साताऱ्यात मनसे उदयनराजेंच्या पाठीशी, काय म्हणाले उदयनराजे...


उदयनराजे भोसलेंच्या रॅलीत चोरांचा धुमाकूळ, 50 तोळे सोनं, मोबाईल्स आणि नागरिकांची पाकिटं लंपास


आम्ही कुणावर अन्याय होऊ दिला नाही आणि यापुढेही होऊ देणार नाही : उदयनराजे भोसले


'मुलं मुलींकडे बघणार नाहीत तर काय मुलांकडे बघणार का?' या वक्तव्याबाबत उदयनराजे म्हणतात...


VIDEO | साताऱ्यातून उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील सामना रंगणार? | एबीपी माझा