Chalisgaon Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी (Maharashtra Assembly Election 2024) संपूर्ण राज्यात एकाच वेळी मतदान होणार पार पडले. यंदा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अतिशय रंजक होती. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची (Chalisgaon Vidhan Sabha Constituency) राज्यात सर्वाधिक चर्चा होती. महाराष्ट्रातील चाळीसगाव विधानसभा जागा राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 17 व्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघातून भाजपाचे मंगेश चव्हाण विजयी झालेत, तर उबाठा सेनेचे उन्मेष पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.


भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ, राखला गड


लोकसभा निवडणुकीवेळी उन्मेष पाटील यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केल्याचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांच्यात थेट लढत पार पडली, ज्यात भाजपने गड राखला आहे. मंगेश चव्हाण विजयी ठरले आहेत. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ ही भाजपसाठी महत्त्वाची जागा असून त्यामागील कारण म्हणजे या जागेवर 1990 पासून फक्त एकच निवडणूक सोडली तर सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. 2009 मध्ये या जागेवर राष्ट्रवादीचे राजीव देशमुख विजयी झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये भाजपने ही जागा परत घेतली, त्यानंतर 2019 मध्ये भाजपचे मंगेश रमेश चव्हाण येथून आमदार झाले.


2019 च्या निवडणुकीत काय झाले?


2019 निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर मंगेश रमेश चव्हाण यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर राष्ट्रवादीने देशमुख राजीव अनिल यांना संधी दिली होती. या निवडणुकीच्या निकालाबाबत बोलायचे झाले तर भाजपचे मंगेश रमेश चव्हाण यांना 86515 तर देशमुख राजीव अनिल यांना 82228 मते मिळाली. दोघांमधील अटीतटीच्या लढतीत भाजपचे मंगेश चव्हाण विजयी झाले होते. त्यामुळे यंदा 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अतिशय रंजक असणार आहे. यंदा जुन्या पक्षांना नवे नेतृत्व मिळाले तर काहींनी जुन्याच नेतृत्वाने नव्या पक्षांची सूत्रे हाती घेतली आहेत. अशा स्थितीत जनता जुन्या पक्षांच्या आघाडीला साथ देणार की जुन्या नेतृत्वाला हे पाहायचे आहे.


मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?


महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections/amp  वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/  या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि  निकालाचे अपडेट पाहू शकता.


हेही वाचा>>


Chopda Vidhan Sabha Constituency: चोपड्यात शिवसेनेत होणार थेट लढत, जनता कोणाच्या पारड्यात विजय देणार? कोण उधळणार विजयाचा गुलाल?