हे ही वाचा - भुसावळ विधानसभा मतदारसंघ | भाजपचे वर्चस्व कोण मोडीत काढणार?
जिल्ह्यात काँग्रेसी विचारधारा रूजली असल्याने 1985 पर्यंत या मतदारसंघाने काँग्रेसला साथ दिली. 1990 पासून मात्र भाजपाकडे हा मतदारसंघ झुकलेला दिसून येतो. 1995, 1999, 2004 या तीनही वेळा भाजपचे साहेबराव घोडे या मतदारसंघातून निवडून आले. मात्र 2009 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर 2014 मध्ये परत मोदी लाटेत या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व मिळवले. तरूण उच्चशिक्षित नवखे उमेदवार उन्मेश पाटील यांना तिकीट देऊन निवडून आणले होते.
हे ही वाचा - चोपडा विधानसभा मतदारसंघ : चंद्रकांत सोनवणे यांना विजयासाठी करावा लागणार संघर्ष
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ए. टी . नाना पाटील यांचे तिकीट कापून पहिल्यांदा स्मिता वाघ यांना दिले. मात्र अमळनेर येथील पक्षाच्या बैठकीत मारहाण प्रकरण गाजले आणि स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करून उन्मेष पाटील यांना दिले गेले होते.
हे ही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन यांचे एकहाती वर्चस्व
2009 मध्ये मात्र भाजपला यश आले नाही. राष्ट्रवादीचे राजीव देशमुख विजयी झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये उन्मेष पाटील यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून भाजप फार्मात आहे. आता उन्मेष पाटील लोकसभेत गेल्याने चाळीसगावच्या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी करण्यासाठी मंगेश पाटील, उन्मेष पाटलांच्या पत्नी संपदा पाटील, बेलगंगा कारखान्याचे चित्रसेन पाटील असे अनेकजण इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून राजीव देशमुख हे एकमेव नाव समोर आहे. शिवसेनेने देखील तयारी ठेवली असून तेथे नाना कुमावत हे दावेदार असतील. वंचित आघाडी येथे उमेदवार देऊ शकते. त्यात माजी आमदार ॲड. ईश्वर जाधव किंवा त्यांच्या परिवारातून एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात काँग्रेसची स्थिती ही अत्यंत नाजूक असल्याने काँग्रेसकडे उमेदवारच नाही.
हे ही वाचा -पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघ : विरोधात आमदार देण्याची परंप