BMC Election: मुंबईमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्रित निवडणूक लढत आहे. शिवसेना ठाकरे गट मुंबईमध्ये 163 जागांवर लढत आहे. मनसे 53 जागांवर लढत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 11 जागा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जागा वाटपाच्या शेवटच्या क्षणापर्यंत बैठकांवर बैठकांमुळे एकाच प्रभागांमध्ये दोन उमेदवार आमने-सामने आले आहेत. त्यामुळे आता मनसैनिकांसह शिवसैनिक सुद्धा संभ्रमात आहेत. वॉर्ड नंबर 81 मध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आमने-सामने आले आहेत. ठाकरे गटाकडून मोहिनी धामणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर याच ठिकाणी मनसेचा सुद्धा अधिकृत उमेदवार असलेल्या शबनम शेख यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे शबनम शेख यांना काल दुपारीच मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यात आला होता. मात्र रात्री उशिरा अचानक साडेअकराच्या सुमारास अर्ज दाखल करू नका, असं सांगण्यात आलं होतं.  

Continues below advertisement

माघार घेण्यासाठी सूचना केली जाणार?

या जागेसाठी उद्धव ठाकरे गटाकडूनही दावा करण्यात आला होता. मात्र, आज सकाळी पुन्हा एकदा त्यांना अर्ज भरण्यासाठी सूचना करण्यात आल्या. त्यानुसार शबनम शेख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार मोहिनी धामणे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता युतीचे दोन्ही उमेदवार आमने सामने आल्याने कार्यकर्ते सुद्धा संभ्रमावस्थेत पडले आहेत. त्यामुळे आता निवडून द्यायचं कोणाला की ठाकरेंच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी सूचना केली जाणार याकडे सुद्धा लक्ष असेल.  

कोणत्या वॉर्डात ठाकरे मनसे युतीत बंडखोरी?

  • 95 चंद्रशेखर वायंगणकर, ठाकरे (अधिकृत उमेदवार हरी शास्त्री - ठाकरे)
  • 106 सागर देवरे, ठाकरे (अधिकृत उमेदवार सत्यवान दळवी - मनसे)
  • 114 अनिशा माजगावकर, मनसे (अधिकृत उमेदवार राजोल पाटील - ठाकरे)
  • 169 कमलाकर नाईक, ठाकरे (अधिकृत उमेदवार प्रवीणा मोरजकार - ठाकरे)
  • 193 सूर्यकांत कोळी, ठाकरे (अधिकृत उमेदवार हेमांगी वरळीकर - ठाकरे)
  • 196 संगीता जगताप, ठाकरे (अधिकृत उमेदवार पद्मजा चेंबूरकर - ठाकरे)
  • 202 विजय इंदुलकर, ठाकरे (अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव - ठाकरे)
  • 203 दिव्या बडवे, ठाकरे (अधिकृत उमेदवार भारती पेडणेकर - ठाकरे)

याच प्रभागत शिंदेंच्या आमदार पत्नीला भाजपची उमेदवारी 

दरम्यान, याच प्रभागात शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांची पत्नी केशरबेन पटेल भाजपकडून प्रभाग 81 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार मुरजी पटेल यांच्या उपस्थितीमध्ये अंधेरीत शक्तीप्रदर्शन करत केशरबेन पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी मोठा संख्येनं शिवसेना शिंदे गटाचे आणि भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. केलेल्या कामावर आणि लोकांच्या विश्वासावर पत्नी निवडून येणार असा दावा मुरजी पटेल यांनी केला.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या