मुंबई : एकीकडे निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक कितीही चांगली आणि कडक पद्धतीने झाल्याचा दावा केला जात असला तरी दुसरीकडे अनेक ठिकाणी बोगस आणि दुबार मतदार समोर आल्याचं दिसून आलं. काही ठिकाणी तर मूळ मतदार पोहोचायच्या आधीच बोगस मतदारांनी मतदान केल्याचं दिसून आलं. धारावीतही असाच प्रकार घडला. मग तक्रार केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या मूळ मतदारालाही मतदानाची परवानगी दिली. त्यामुळे आधी मतदान झालं असतानाही नंतर मूळ मतदाराने कोणत्या नावे मतदान केलं याबद्दल कुणीही माहिती द्यायला तयार नाही. 

Continues below advertisement

आपल्या पतीच्या नावाने आधीच मतदान झाल्याने आपल्या पतीला मतदान करू दिले जात नाही असं म्हणत एका महिलेने धारावी मतदान केंद्रावर गोंधळ घातला. तेव्हा या नावाने आधीच मतदान झालं असलं तरी त्या मतदाराला पुन्हा मतदान करायला निवडणूक अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. 

यासंबंधी एबीपी माझाने अधिकाऱ्यांना विचारलं असता कोणीही यावर बोलायला तयार झालं नाही. मात्र आधीच कोणीतरी दुसऱ्याने या मतदाराच्या नावाने मतदान केलं असं सांगितलं तर मग आता दुबार मतदान कोणाच्या नावाने केलं जातंय? हा प्रश्न आणि अनुत्तरीत आहे.

Continues below advertisement

लालबागमध्ये गोंधळ

लालबागच्या मेघवाडीत मतदार यादीत दोन वेळा नाव आल्याने मतदारांना मतदान करताना कायदेशीर प्रक्रियेत वेळ घालवावा लागला. त्यानंतर या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला. तर एका महिलेचे नाव चक्क वॉर्ड क्रमांक 34 मालाडमध्ये दाखवण्यात आले आहे. तर मेघवाडीत एकाच महिलेचे नाव यादीत दोन वेळा असून दोन्ही नावापुढे पत्ते मात्र वेगवेगळे असल्याने मतदान नेमकं करायचं कुठे हा प्रश्न महिलेसमोर उपस्थित झाला

भगवा गार्ड आणि भाजपमध्ये वादावादी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान दुबार मतदारांना शोधण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मतदार केंद्राबाहेर आपले कार्यकर्ते तैनात केले होते. भगवा गार्ड, असं लिहिलेले टी-शर्ट घालून हे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर दिसत होते. यापैकी काही कार्यकर्त्यांची भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांशी बाचाबाची झाल्याचे प्रकार घडले.

मुंबईच्या बोरिवलीतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये जोरदार गोंधळ झाला. भगवा गार्ड बोगस मतदारांचा शोध घेत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. 

ही बातमी वाचा: