मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result) महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्का बसला आहे. या निवडणुकीचा निकाल अविश्वसनीय आहे, असं विरोधक म्हणत आहेत. ही निवडणूक अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि भाजपाने एकत्र मिळून लढवली होती. या तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी राज्यभरात एकदिलाने प्रचार केला होता. असे असले तरी भाजपाचे नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी मात्र गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. माझ्याविरोधात कट शिजला, असा आरोप करून रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या विजयासाठी अजित पवार यांनी प्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे हा आरोप करताना ते भावूक झाले आहेत.
राम शिंदे यांनी केलेले पाच मोठे दावे
1) मला या सगळ्या गोष्टीची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या माहिती होती. आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर अजित पवार खरं बोलले. निवडणूक लागण्यापूर्वी त्यांचा एक कौटुंबिक करार झाला. कर्जत जामखेड मतदारसंघाबाबत एक कट रचला गेला. याच कटाचा मी बळी आहे.
2) ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला, त्याच दिवशी रोहित पवार अर्ध्या रात्री अजित पवार यांच्याकडे जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. माझ्याकडे ही खात्रीलायक माहिती आहे. आज या दोघांची समोरासमोर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली.
3) अजित पवार यांच्या तोंडातून आज खरं बाहेर आलं. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर त्यांनी असं राजकारण केलं. ते वरिष्ठ नेते आहेत. महायुतीतील घटकपक्षाचे ते नेते आहेत. कटकारस्थान रचून त्यांनी हे काम केलेले आहे. त्यांच्याच तोंडून जेव्हा हे समोर आलं, तेव्हा मला या कटाची खरी परिचिती आलेली आहे.
4) मी अजित पवार यांच्या वारंवार सभा मागितल्या होत्या. मी पक्षाकडे, नेतृत्त्वाकडे, दिल्लीचे प्रभारी यांच्याकडेही मी अजित पवार यांच्या सभा मागीतल्या होत्या. पण अजित पवार यांनी सभा दिल्या नाही. माझा समज होता की, अजित पवार यांचाही एक पक्ष आहे. इतर ठिकाणी अजित पवार यांची मागणी जास्त आहे, त्यामुळेच ते कर्जत जामखेड येथे आले नसावे. पण अजित पवार हे जाणीवपूर्क आलेले नाहीत, हे आज खरं ते समजलं आहे.
प्रीतिसंगमवर नेमकं काय घडलं?
आमदार रोहित पवार आणि अजित पवार हे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी कराड येथील प्रीतिसंगम या स्मृतीस्थळावर गेले होते. येथे या दोघांची समोरासमोर भेट झाली. त्यानंतर अजित पवार यांनी मिश्किलपणे रोहित पवार यांना पाया पडायला लावले. तसेच माझी सभा तुझ्या मतदारसंघात झाली असती तर तुझं काही खरं नव्हतं, असंही अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. हाच धागा पकडत राम शिंदे यांनी अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात संगमनत होतं, असा आरोप केला आहे.
Ram Shinde Video News :
हेही वाचा :
ट्रम्पेटनं डाव साधला, शरद पवारांच्या पक्षाला तब्बल 9 जागांवर फटका; अनेक ठिकाणी 'सातारा' पॅटर्न!