PMC Election, Lahu Balwadkar पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी असा सामना होणार आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक विविध वादांमुळं राज्यभर चर्चेत आहेत. भाजपनं अमोल बालवाडकर यांना उमेदवारी नाकारल्यानं थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात उमेदवारी मिळवली. भाजपनं या ठिकाणी लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचं लहू बालवडकर यांना उमेदवारी देण्याचं गणित समोर आलंय.

Continues below advertisement

वॉर्ड 9 मधून लहू बालवडकर रिंगणात

पुण्यातील प्रभाग क्रमांक नऊची सध्या शहरात चर्चा सुरु आहे. या प्रभागात भाजपने अमोल बालवडकर यांचं तिकीट नाकारलं आणि थेट त्यांच्याच भावकीत असलेल्या लहू बालवडकर यांना दिलं. मात्र अगदी शेवटच्या क्षणी लहू बालवडकर यांना भाजपने उमेदवारी का दिली असावी?, असा प्रश्न निर्माण होतोय. पुण्यात भाजपने शेवटपर्यंत उमेदवार यादी जाहीर केली नाही. महायुती होणार की नाही यावर अजूनही प्रश्न चिन्ह आहेच. रात्रीतून भाजपने लहू बालवडकरांचं नाव का समोर केलं हाही प्रश्न आहे.

भाजपने शेवटपर्यंत उमेदवार यादी गुलदस्त्यात ठेवली. त्याचं कारण फार सोपं होतं ते म्हणजे पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी आणि त्या क्षणी तयार झालेला रोष. अमोल बालवडकरचं नाव पहिल्याच यादीत आहे. त्यांना एबी फॉर्म दिलाय अशा चर्चा सुरु होत्या. मात्र भाजपच्या पुण्यातील नेत्यांमध्ये विधानसभेच्यावेळी अमोल बालवकरांनी आमदारकीसाठी धरलेला हट्ट आणि त्यांची काढलेली समजूत ही समोर होतीच. त्यामुळे त्यांना बाजूला सारुन भाजपने मास्टरस्ट्रोक देण्याचं ठरवलं. भाजपने शेवटच्या रॅमी ग्रॅंड हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आणि त्यातला महत्वाचा निर्णय हा लहू बालवडकरांना उमेदवारी देण्याचा होता. अखेर पहाटे लहू बालवडकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. 

Continues below advertisement

लहू बालवडकरांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि कामात सक्रिय झाले. सोबतच त्यांनी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत सक्रिय काम केलं. त्यानंतर त्यांना कोथरुडमधून मंडल अध्यक्ष पद भाजपनेच देऊ केलं. त्यांची आतापर्यंत असलेली निष्ठेमुळे आणि कामामुळे भाजपने उमेदवारी दिली.सोबतच यंदा भाजपला जुन्या उमेदवारांना अनेक ठिकाणी उमेदवारी द्यायची नव्हती. सुरुवातीला स्टॅंडिंग उमेदवारांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र 42 माजी नगरसेवकांच्या तिकीट भाजपने कापले आणि त्यातच लहू बालवडकरला संधी दिली. भाजपने यंदा तरुणांना पुढे करण्याचं निश्चित केलं होतं. त्यात लहू बालवडकर अव्वल चेहरा भाजपला दिसला. त्यामुळे भाजपने त्यांना उमेदवारी दिली.