Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या प्रारंभिक कल समोर येत आहेत. या कलांनुसार मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांची मजबुत पकड पुन्हा एकदा स्पष्ट होत असून त्यांची पार्टी जनता दल (युनायटेड) साधारण ८१ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, जेडीयूने सोशल मीडियावर नीतीश कुमार (Nitish Kumar) पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा संकेत देणारी पोस्ट टाकली होती. पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर त्यांचा फोटो शेअर करत कॅप्शन देण्यात आले होते— “न भूतो न भविष्यति… नीतीश कुमार बिहार के मुख्यमंत्री थे, हैं और रहेंगे.” मात्र ही पोस्ट काही वेळानंतर हटवण्यात आली. यापूर्वीही पटण्यातील पक्ष मुख्यालयाबाहेर लावलेल्या पोस्टरवर एका समर्थकाने लिहिले होते, “टायगर अभी जिंदा है.”(Nitish Kumar)

Continues below advertisement




Bihar Election: निवडणुकीपूर्वी नीतीश कुमार ‘आजारी’ असल्याची चर्चा


मतदानापूर्वी नीतीश कुमार आजारी आहेत, त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही, अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मात्र मतदान संपताच त्यांनी घेतलेला सक्रिय पवित्रा एनडीए पॅनलमध्ये वेगळा संदेश देणारा ठरला असून आता ते पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने पुढे जात असल्याचे चित्र दिसत आहे.


Bihar Election: सध्या काय कल आहेत?


दुपारी सव्वा एकपर्यंतच्या कलांनुसार एनडीए आघाडीमध्ये जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर हे कल निकालात बदलले तर जेडीयू अंदाजे ८० जागा जिंकू शकते. बीजेपी सध्या ‘मोठा भाऊ’ ठरल्यासारखा दिसत असून ९० जागांवर आघाडीवर आहे. एनडीएमधील चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपीलाही २१ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर इतर सहयोगी पक्ष सुमारे सात जागांवर आगेकूच करत आहेत.


Bihar Election:  बिहारच्या निकालावर देवाभाऊची छाप


बिहारमधील 61 मतदारसंघांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा प्रभाव पडला. बिहारमधील 61 मतदारसंघापैकी 49 मतदारसंघात एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जिल्ह्यात काही मतदारसंघात प्रचार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये प्रचार सभा आणि रॅली केल्या होत्या. दरम्यान, मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात थोड्याच वेळात बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल जल्लोष केला जाणार आहे. 


2020  विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Election Result 2020)


मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने 74 जागा, जेडीयूने 43 आरजेडीने 75 , एलजेपीने 1, एआयएमआयएमने 5, काँग्रेसने 19, सीपीएमने 2, सीपीआयने 2 आणि बसपाने 1 जागा जिंकल्या होत्या.